आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुलीप ट्रॉफी, फायनलमध्ये इंडिया ब्ल्यूची इंडिया रेडवर ३५५ धावांनी मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेेटर नोएडा - रवींद्र जडेजा (५ विकेट) आणि कर्ण शर्मा (३ विकेट) यांच्या दमदार गोलंदाजीसमोर शिखर धवन आणि युवराजसिंगसारख्या दिग्गजांनी सजलेल्या इंडिया रेड संघाने दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये अखेरच्या दिवशी समर्पण केले. या एकतर्फी सामन्यात इंडिया ब्ल्यू संघाने ३५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार इंडिया ब्ल्यूचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला मिळाला. त्याने पहिल्या डावात नाबाद २५६ धावा ठोकल्या होत्या. लेगस्पिनर रवींद्र जडेजाने सामन्यात एकूण १० गडी बाद केले. तो गेमचेंजर ठरला.

इंडिया ब्ल्यूने सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंडिया रेडसमोर विजयासाठी ५१७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, इंडिया रेड स्टार खेळाडूंची उपस्थिती असताना दुसऱ्या डावात अवघ्या ४४.१ षटकांत १६१ धावांत ते ढेपाळले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिया रेडच्या फलंदाजांनी खास संघर्ष केला नाही. मधल्या फळीत गुरकिरत सिंगने ३९ धावांची खेळी केली, तर चार फलंदाज शून्यावर बाद झाले. शिखर धवनने २९ धावा काढल्या. शिखरने ५० चेंडूंचा सामना करताना ३ चौकार मारले. परवेज रसूलच्या चेंडूवर गंभीरने त्याचा झेल घेतला. अष्टपैलू कर्णधार युवराजसिंगसुद्धा २१ धावा काढून बाद झाला. इंडिया रेडचा डाव ड्रिंक्सच्या ब्रेकनंतर गारद झाला. नथ्थूसिंगला ११ धावांवर पायचीत करून जडेजाने डावातील पाचवी घेतली. यासह त्याने इंडिया ब्ल्यूच्या विजयावर

शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, इंडिया ब्ल्यूने आपला दुसरा डाव ५ बाद १७९ धावा काढून घोषित केला. इंडिया ब्ल्यूकडून दुसऱ्या डावात रोहित शर्माने नाबाद ३२ धावा काढल्या. रवींद्र जडेजाने १७ धावा, गंभीरने ३६, तर मयंक अग्रवालने ५२ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या डावात रोहितने चांगला खेळ केला. इंडिया रेडकडून कुलदीप यादवने ६२ धावांत ३ गडी बाद केले. अमित मिश्राने एकाला बाद केले.
संक्षिप्त धावफलक
इंडिया ब्ल्यू : पहिला डाव ६ बाद ६९३ धावा. दुसरा डाव ५ बाद १७९ धावा. (डाव घोषित). इंडिया रेड : पहिला डाव ३५६ धावा, दुसरा डाव १६१ धावा.
बातम्या आणखी आहेत...