आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 फूट ऊंच क्रिकेटपटूला पाहून फॅन्स हैराण, स्टेडियममध्ये दिसला असा नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडिजचा २४ वर्षीय अष्टपैलू व धिप्पाड क्रिकेटपटू रहकीम कॉर्नवाल... - Divya Marathi
वेस्ट इंडिजचा २४ वर्षीय अष्टपैलू व धिप्पाड क्रिकेटपटू रहकीम कॉर्नवाल...
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिज दौ-यावर इंग्लंडची टीम आहे. त्यांनी नुकताच तेथे सराव सामना खेळला. या मॅचमध्ये यजमान वेस्ट इंडिजला एक नवा स्टार मिळाला, ज्याचे नाव आहे रहकीम कॉर्नवाल. या मॅचमध्ये त्याने 59 धावांची खेळी केली. यानंतर तो आपल्या फलंदाजीने नव्हे तर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. मैदानावर पाहताच फॅन्स झाले हैराण...
 
- मॅचमध्ये एक जबरदस्त खेळी केल्यानंतर रहकीमची चर्चा त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे तर वेगळ्याच कारणाने झाली. 
- तो खूप मोठ्या शरीराचा असल्याने चर्चेत आहे. जेव्हा तो मैदानात उतरला तेव्हा लोक त्याच्याकडे पाहून चकित झाले.
- केवळ 24 वर्षाचा रहकीम 200 सेंटीमीटर रूंद आहे तर त्याची उंची 6.7 फूट आहे. त्याचे वजन 140 किलो आहे. 
- शरीराने एवढा धिप्पाड असणा-या क्रिकेट फॅन्समध्ये तो सेंटर ऑफ अट्रेक्शन बनला होता. 
- इंग्लंडविरूद्ध जेव्हा तो फलंदाजी करण्यासाठी उतरला तेव्हा फॅन्स शॉक्ड झाले. 
 
इंग्लंडविरूद्ध ठोकले अर्धशतक-
 
- इंग्लंडविरूद्ध सराव सामन्यात रहकीमने प्रेसिडेंट इलेवन टीमकडून खेळताना 61 बॉलमध्ये 59 धावा केल्या. 
- आपल्या इनिंगदरम्यान रहकीमने बेन स्टोक्स, आदिल राशिद, ख्रिस वोक्स आणि लियाम प्लेंकेट यासारख्या बॉलर्ससमोर तीन षटकार आणि तीन चौकार मारले. 
- मात्र, त्याचे धिप्पाड शरीरच त्याच्या करिअरच्या आड आले आहे. त्यामुळेच त्याचे नॅशनल टीममध्ये सिलेक्शन होऊ शकले नाही. 
- वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डचे प्रेसिडेंट कर्टनी ब्राउन यांचे म्हणणे आहे की, आम्ही रहकीमला वजन कमी करण्यासाठी सांगितले आहे तसेच तो यावर काम करत आहे.
- क्रिकेटमध्ये सर्वात वजनी क्रिकेटर होण्याचा विक्रम बरमूडाचा माजी कर्णधार ड्वेन लेवरॉकच्या नावावर आहे. 
- 2007 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळी बरमूडाचा कर्णधार लेवरॉकचे वजन त्यावेळी 120 किलोग्राम होता. 
- मात्र, आता रहकीमने लेवरॉकला मागे सोडले आहे. 
 
ऑलराउंडर आहे रहकीम-
 
- रहकीम कॉर्नवाल एक ऑलराउंडर आहे. बॅटिंग सोबतच तो ऑफ स्पिन बॉलिंग करतो. 
- त्याने आतापर्यंत 25 फर्स्ट क्लास मॅच खेळला आहे. ज्यात त्याने 1014 धावा केल्या आहेत. त्याचा बेस्ट स्कोर नाबाद 101 धावा असा आहे. याशिवाय त्याने 125 विकेट सुद्धा मिळवल्या आहेत.
- वर्ष 2015-16 मध्ये देशांतर्गत सीजनमध्ये कॉर्नवाल दुसरा सर्वात यशस्वी बॉलर राहिला. त्याने 10 मॅचमध्ये 48 विकेट घेतल्या होत्या.
- गेल्या वर्षी जुलै महिन्यात भारताविरूद्ध झालेल्या सराव सामन्यात कॉर्नवालने 5 विकेट घेतल्या होत्या. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसा दिसतो रहकीम जेव्हा तो ग्राउंडवर असतो.....
बातम्या आणखी आहेत...