आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍टार क्रिकेटरने चालवली दारू पिऊन कार, त्‍यामुळे मिळाली ही शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारू पिऊन ड्रायविंग केल्‍याप्रकरणी ऑलराऊंडर जेम्स फॉकनर याला ऑस्‍ट्रेलियाने 4 मॅचसाठी बंदी घातली आहे. कमी ओव्‍हरच्‍या सामन्‍यांमध्‍ये निश्‍चितच या बंदीचा प्रभाव होऊ शकतो. आयरलँडविरोधार दोन T-20 आणि इंग्‍लंडच्‍या विरोधातील देान वनडे मॅचमधून तो बाहेर राहणार आहे. ऑस्‍ट्रेलिया क्रिकेटने नुकतीच या बंदीची घोषणा केली आहे. दारू पिऊन वाहन चालवल्‍यामुळे फॉकनरला पोलिसांनी दंडही ठोठावला आहे.
प्रकरणाची सुनावणी 21 जुलैला
मागील आठवड्यात गुरूवारी रात्री मॅनचेस्‍टर पोलिसांनी फॉकनर याला अटक केले. कारवाईच्‍यावेळी त्‍याच्‍याकडे मर्यादेपलिकडे दारू मिळाली. नंतर मात्र, जामीनावर त्‍याला सोडण्‍यात आले. मॅनचेस्‍टरमध्‍ये 21 जुलैला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
फॉकनरने मागितली माफी
25 वर्षीय स्‍टार खेळाडू फॉकनरने या गुन्‍ह्यानंतर माफी मागितली. तो म्‍हणाला, 'माझ्या चुकीसाठी मला दिलेली सजा भोगायला मी तयार आहे. ऑस्‍ट्रेलियाचे जनरल मॅनेजर पॅट हॉवर्ड या घटनेवर म्‍हणाले की, ' दारू पिऊन गाडी चालवणे ही बाब चुकीचीच आहे. त्‍यामुळे इतरांनाही धोका पोहचू शकतो. आता या प्रकरणानंतर ऑस्‍ट्रेलियन किक्रेटर्सना चांगला धडा मिळेल.' असेही ते म्‍हणाले.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, फॉकनरचे काही फोटो..