आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • James Taylor Century Helps England Beat Australia In Third ODI

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंडची मालिकेत २-१ ने आघाडी, ऑस्ट्रेलियावर ९३ धावांनी मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्टर - सामनावीर जेम्स टेलरच्या शानदार शतकाच्या बळावर इंग्लंडने तिसर्‍या वनडेत ऑस्ट्रेलियावर ९३ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा हा दुसरा विजय ठरला. इंग्लंडने ५० षटकांत ८ बाद ३०० धावा उभारल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव ४४ षटकांत सर्वबाद २०७ धावांवर आटोपला. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-१ ने आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने तीनशेचा पल्ला गाठला. यात सलामीवीर जाॅसन रॉयने ४५ चेंडूंत ९ चौकार खेचत ६३ धावा कुटल्या. जेम्स टेलरने शतकी खेळी केली. त्याने ११४ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांसह १०१ धावा ठोकल्या. इयान मॉर्गनने ६२ धावा जोडल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅरोन फिंचने अर्धशतक ठोकले. त्याने ६० चेंडूंत ८ चौकार खेचत ५३ धावा काढल्या. मॅथ्यू वेडने (४२) संघर्ष केला. इतर सर्व प्रमुख फलंदाज अपयशी ठरले.