आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Rioपॅरॉलिंपिक: भालाफेकमध्ये भारताच्या देवेंद्र झांझरियाला सुवर्णपदक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओत सुरु असलेल्या पॅरालिंपिकमध्ये भारताच्या देवेंद्र झांझरियाने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. - Divya Marathi
रिओत सुरु असलेल्या पॅरालिंपिकमध्ये भारताच्या देवेंद्र झांझरियाने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले.
रिओ- रिओत सुरु असलेल्या पॅरालिंपिकमध्ये भारताच्या देवेंद्र झांझरियाने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. यासोबतच भारताला तिसरे पदक मिळाले. 35 वर्षाच्या देवेंद्रचे हे पॅरालिंपिकमधील हे दुसरे सुवर्णपदक आहे. त्याने 63.97 मीटर भाला फेकत 2004 साली अथेन्स पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकताना केलेल्या 62.15 मीटरचा विक्रम मोडित काढला. पॅरालिंपिकमध्ये भारताला आतापर्यंत 12 मेडल...
- भारताने रिओ पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंत दोन गोल्ड, एक सिल्वर आणि एक ब्राँझ जिंकले आहे.
- उंचउडीत मरियप्पन थंगावेलूने सुवर्ण तर वरूण भाटीने ब्राँझ जिंकले होते. तर दीपा मलिकने सिल्वर जिंकले आहे.
- भारताकडे पॅरालिंपिकमधील एकून 12 मेडल्स आहेत. यात 4 गोल्ड, 4 सिल्वर तर 4 ब्राँझ आहेत.
करंट लागल्याने काटावा लागला होता डावा हात-

- राजस्थानमधील चूरू जिल्ह्यातील राहणारा देवेंद्र 8 वर्षाचा असताना झाडावर चढला होता.
- त्यावेळी तेथून गेलेल्या वीजेच्या तारा झाडाला चिकलेल्या होत्या. त्यामुळे देवेंद्रचा वीजेचा जोरदार झठका बसला.
- यात त्याचा हात संपूर्ण जळाला होता. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही त्याचा हात काटावा लागला.
- हात नसतानाही देवेंद्रने देशासाठी दक्षिण कोरियात 2002 मध्ये झालेल्या FESPIC गेम्स, अथेन्स 2004 पॅरालिंपिक, 2013 वर्ल्ड अॅथलिटिक्स चॅम्पियनशिप आणि आता रिओ पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत.
- 2014 साली त्याने एशियन गेम्समध्ये सिल्वर जिंकले होते.
- मार्च 2012 मध्ये त्याला राष्ट्रपतीनी पद्मश्रीने गौरवले होते. असा सन्मान मिळवणारा तो पहिला पॅरालिंपियन आहे.
- 2004 साली अथेन्स पॅरालिंपिकमध्ये वर्ल्ड रिकॉर्ड केल्यानंतर त्याला अर्जून पुरस्कार मिळाला होता.
भारताच्या तीन खेळाडूंनी भालाफेकमध्ये घेतला सहभाग-

- रिओ पॅरालिंपिकमध्ये भारताकडून तीन भालाफेकपट्टूनी सहभाग घेतला.
- देवेंद्रशिवाय रिंकू सिंग भालाफेकीत पाचव्या स्थानावर राहिला.
- याशिवाय सुंदर सिंग गुर्जरकडूनही पदकाची अपेक्षा होती. मात्र तो इव्हेंटसाठी वेळेत स्टेडियमवर पोहचला नाही. त्यामुळे त्याला बाद करण्यात आले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, भारताने पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंत काय काय कमाल केली...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...