आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवाचे उट्टे फेडत यू मुंबाचा जयपूर पँथर्सवर विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मागच्या वर्षी फायनलच्या पराभवाचे उट्टे अवघ्या एका गुणाने (२९-२८) फेडून यू मुंबाने जयपूर पिंक पँथर्सला हरवले. प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामाची सलामीची लढत क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत होती. प्रत्येक वेळी निसटती आघाडी घेणाऱ्या यू मुंबाने अखेर एका गुणाने सलामी जिंकली.
गतविजेते जयपूर पिंक पँथर आणि यजमान यू मुंबा यांच्यातील पूर्वार्धात तुल्यबळ लढत झाली. यू मुंबाने प्रारंभी आघाडी घेतली होती. मात्र, प्रत्येक वेळी जयपूरच्या जसबीरने चढायांमध्ये गुण आणून बरोबरी करून दिली. पूर्वार्धातच जयपूरने १४-१२ अशी निसटती आघाडी घेतली होती. मात्र, मुंबईच्या विशाल मानेने मैदानात ३ खेळाडूंत ३ चांगल्या पकडी केल्या आणि मध्यंतराची शिट्टी वाजली, त्या वेळी आपल्या संघाला १६-१५ अशी अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. नवा हंगाम, नवे खेळाडू, नवी आव्हाने आणि नव्या कल्पना यांच्यासह प्रो कबड्डीचे दुसरे पर्व आजपासून मुंबईच्या नॅशनल स्पोर्ट््स क्लबवर सुरू झाले.
क्रिकेटच्या थाटात प्रत्येक खेळाडूची ओळख, त्याची शक्तिस्थाने, त्याची गुणवत्ता आणि फोटोसह त्याच्या पोझिशनची माहिती प्रेक्षकांना सर्वप्रथम मिळाली.

बंगळुरूची विजयी सलामी : मंजितच्या नेतृत्वाखाली बंगळुरू बुल्स संघाने शनिवारी दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये विजयी सलामी दिली. बंगळुरू संघाने बंगाल वाॅरियर्सवर ३३-२५ ने मात केली. अजय ठक्करने सर्वाधिक ११ गुणांचे याेगदान दिले.

राष्ट्रगीताने सुरुवात
अमिताभ बच्चन यांनी धीरगंभीर आवाजात राष्ट्रगीत गायलेे. यानंतर सामन्यांना सुरुवात झाली. अामिर खान, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, जया भादुरी, अभिषेक बच्चन आदी सिनेकलावंत कौतुकाने, उत्साहाने हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर हजर होते. क्रिकेटपटू कपिलदेव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य क्षेत्रांतील लोकांनीही कबड्डीचे दुसरे पर्व पाहण्यास शनिवारी आवर्जून हजेरी लावली.
बातम्या आणखी आहेत...