आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अायएसएसएफ आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा; जितू रॉयची सर्बियाच्या दामिरवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचाअव्वल नेमबाज जितू रॉयने सोमवारी चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली. त्याने अायएसएसएफच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत हे यश संपादन केले. त्याने पुरुषांच्या पिस्तूल प्रकारात हा पराक्रम गाजविला.
भारताच्या जितू राॅयने फायनलमध्ये सर्बियाच्या दामिर मिकेसवर मात केली. त्याने १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत २९.६-२८.३ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला. यासह त्याला ही ट्राॅफी अापल्या नावे करता अाली. या वेळी त्याला ट्राॅफी अाणि राेख हजार डाॅलरचे बक्षीस देऊन गाैरवण्यात अाले.
इटलीतील बाेलाेगाेना येथील विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतही जितू राॅयने सरस कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत राैप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेनंतर चॅम्पियन्स ट्राॅफीचे अायाेजन करण्यात अाले. यात राैप्यपदक विजेता जितू राॅय चमकला. त्याने या ट्राॅफीवर नाव काेरले. रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील अपयशातून सावरलेल्या जितूने शानदार कमबॅक केले. अाता हीच लय अागामी स्पर्धेतही कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. यासाठी त्याने कसून सरावावर अाता लक्ष केंद्रीत केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...