आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववीत नापास झाल्याने हार्दिकने सोडले होते शिक्षण, आता टीम इंडियात महत्त्वाचा ऑल राऊंडर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अापल्या पहिल्याच वनडेत मॅन ऑफ द मॅच ठरणारा हार्दिक पंड्या भारतीय क्रिकेटचा नवा तारा आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत पंड्या अष्टपैलूची भूमिका समर्थपणे पार पाडत आहे. त्याचा भाऊ कृणाल पंड्यासुद्धा क्रिकेटपटू आहे.

गुजरातचे दोन भाऊ कृणाल आणि हार्दिक पंड्या. दोघांना बालपणापासून क्रिकेटमध्ये रस होता. कृणाल बालपणापासून क्रिकेटमध्ये करिअर बनवण्यासाठी सीरियस होता. मात्र, हार्दिक इकडे-तिकडे फिरत असायचा. क्रिकेटसाठी तो फार फोकस नव्हता. तो कधी गोलंदाजी करायचा तर कधी फलंदाजी. दरम्यान, त्यांचे वडील हिमांशू पंड्या दोघांना घेऊन किरण मोरेच्या अकादमीत गेले. या वेळी कृणालचे वय ७ तर हार्दिकचे वय ५ वर्षे होते. मी अकादमीत १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश देत नाही, असे मोरे यांनी स्पष्ट सांगितले. हे दोघे खूप प्रतिभावंत आहेत. एकदा तुम्ही त्यांचा खेळ तर बघा. नंतर त्यांच्या अॅडमिशनचा निर्णय घ्या, असे हिमांशू यांनी सांगितले. दोघांनी आपल्या खेळाने किरण मोरे यांना प्रभावित करून अकादमीत प्रवेश केला. मोरे यांना हार्दिकचा खेळ अधिक आवडला म्हणून त्यांनी त्याची तीन वर्षांची फी माफ केली. येथूनच हार्दिकच्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात झाली.

यानंतर तर हार्दिक क्रिकेटसाठी इतका झपाटला की याचा त्याच्या अभ्यासावरही परिणाम होऊ लागला. तो नववीत नापास झाला. यानंतर तो कधीच शाळेत गेला नाही आणि क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला.

सुरतच्या चौरयासी गावात ११ ऑक्टोबर १९९३ रोजी जन्म झालेल्या हार्दिकच्या वडिलांचा कार फायनान्सचा व्यवसाय होता. हार्दिकच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. कधी कधी तर त्याच्या कुटुंबीयांना एक वेळचे जेवणसुद्धा मिळायचे नाही. कधी-कधी दोन्ही भावांचे जेवण मॅगी असायचे. यानंतरही त्याचे वडील दोन्ही मुलांचे करिअर क्रिकेटमध्ये घडवण्यासाठी १९९९ मध्ये बडोद्यात स्थलांतरित झाले. हार्दिकने स्थानिक स्पर्धांत ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका अाला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. हार्दिक आधी लेगस्पिनर गोलंदाजी करायचा. मात्र, त्याची गोलंदाजी चांगली नव्हती. म्हणून त्याला गोलंदाजी दिली जात नसे. यामुळे त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. अधूनमधून तो वेगवान गोलंदाजी करायचा.
रणजी कोच सनथकुमार यांनी त्याला वेगवान गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. वानखेडेवर सै. मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने दिल्लीविरुद्ध आपल्या बडोदा संघाकडून शानदार प्रदर्शन केले. येथेच मुंबई इंडियन्सचे कोच जॉन राइटची त्याच्यावर नजर पडली. त्यांनी हार्दिकला मुंबई इंडियन्समध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकला संघातील खेळाडू रॉकस्टार म्हणतात. त्याला टॅटू गोंदवण्याचा छंद आहे. त्याने आपल्या हातावर एक टॅटू कोरला आहे, त्यावर ‘टाइम इज मनी’ असे लिहिले आहे. २३ वर्षीय हार्दिक मॉडेल लिसा शर्माला डेट करत आहे. तो सोशल मीडियावर खूप फेमस आहे. त्याला चित्रपट आणि गाण्याचा छंद आहे. अक्षयकुमार आणि अालिया भट्ट त्याला आवडतात. सुपरमॅन त्याचा सुपरहीरो आहे. सचिन, युवराज, हरभजन त्याचे आवडते क्रिकेटपटू आहेत.
बातम्या आणखी आहेत...