आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kane Williamson New Zealand Cricket New Zealand Captain

न्यूझीलंड क्रिकेट संघाचे नेतृत्व केन विल्यम्सनकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन- न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने गुरुवारी स्टार फलंदाज केन िवल्म्यसनला क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपाचा कर्णधार म्हणून िनयुक्त केल्याची घोषणा केली. न्यूझीलंडचा वनडे कर्णधार केन विल्यम्सन आता तिन्ही स्वरूपात कसोटी, वनडे आणि टी-२० मध्ये नेतृत्व करेल. माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमच्या जागी विल्यम्सनला कसोटीत कर्णधार बनवण्यात आले आहे.

मॅक्लुमने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. विल्यम्सन न्यूझीलंडचा २९ वा कसोटी कर्णधार झाला आहे. तो आगामी झिम्बाब्वे आणि द. आफ्रिका दौऱ्यात राष्ट्रीय न्यूझीलंडचे नेतृत्व करेल.

विल्यम्सनने आपल्या निवडीवर आनंद व्यक्त केला असून तो म्हणाला, "मी नशीबवान आहे की मला अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. आताच्या संघातील सर्वच खेळाडू शानदार आहेत. आमची टीम भविष्यात खूप यश मिळवेल याची मला खात्री आहे,' असेही यावेळी न्यूझीलंड टीमच्या नव्या कर्णधाराने नमूद केले.