आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगारू मजबूत स्थितीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत अाॅस्ट्रेलिया संघ भक्कम अाघाडीच्या बळावर मजबूत स्थितीत अाला अाहे. डेव्हिड वाॅर्नरच्या (६०) नाबाद अर्धशतकाने अाॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही दमदार सुरुवात केली. कांगारूंनी दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर शनिवारी बिनबाद १०८ धावा काढल्या. कांगारूंनी तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव ३१२ धावांत गुंडाळला.
त्यामुळे पहिल्या डावातील २५४ धावांसह अाॅस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात एकूण ३६२ धावांची अाघाडी मिळाली. डेव्हिड वाॅर्नरने नाबाद ६० धावांची खेळी केली. क्रिस राॅजर्सने नाबाद ४४ धावा काढल्या. या दाेघांनी १०८ धावांची भागीदारी केली. यासह इंग्लंड संघ अडचणीत आला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ बाद ५६६ धावांवर डाव घोषित केला. इंग्लंडने पहिल्या डावात ३१२ धावा काढल्या.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया : ५६६ धावा (डाव घोषित), दुसरा डाव बिनबाद १०८. इंग्लंड : पहिला डाव २८५ धावा.
बातम्या आणखी आहेत...