आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

138 वर्षांत पहिल्यांदाच डे-नाइट कसोटी, जाणून घ्या, का आली ही वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज ICC वर अशी वेळ आली आहे, जी गेल्या 138 वर्षांच्या इतिहीसात कधीच आली नाही. 'कसोटी सामना' आता डे-नाइट खेळला जाणार आहे. या पद्धतीचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया-न्यूझिलंड यांच्यात शुक्रवारपासून ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेड येथे खेळला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी तब्बल 40 हजार पेक्षाही अधिक प्रेक्षकांनी स्टेडियमवर गर्दी केली होती.
विशेष गोष्ट ही की, हा सामना गुलाबी बॉलने खेळला जात आहे. या गुलाबी बॉलने शनिवारी सान्याच्या दुसऱ्या दिवशी 13 जणांना तंबूत धाडले. डे-नाइट कसोटीत या बॉलच्या कमालीमुळे फलंदाजही आश्यर्यचकित झाले आहेत. जाणून घ्या, ICC ला कसोटो सामने डे-नाइट करण्याची आवश्यकता का भासली?
जेव्हा वन डे आणि टी-20 सामने नव्हते, तेव्हा प्रथम श्रेणी (सथानिक सामने- जसे रणजी ट्रॉफी, दलीप ट्रॉफी, इरानी ट्रॉफी आदी...) आणि कसोटी याच प्रकारचे क्रिकेट होते. मात्र वन डे आणि टी-20 सामन्याच्या वाढत चाललेल्या प्रघातामुळे कसोटी सामन्यांची क्रेझ कमी होत आहे. काही सामन्यांनच्या वेळीतर अनेकदा मैदान सुने-सुने वाटते.
काय म्हणतायेत अयाज मेमन
दिवस-रात्र कसोटीबद्दल मी प्रचंड उत्सुक होतोच. मात्र, अॅडिलेडला गेल्यावर कळले की, लोकांच्या उत्सुकतेला तर सीमाच नाही. द. आफ्रिकेच्या एका मद्य व्यापाऱ्याने मला सांगितले की, गेल्या आठवड्यात ओव्हलमध्ये एक रॉक बँड संगीत कार्यक्रम सादर झाला. त्या वेळी ५० हजार लोक उपस्थित होते. कसोटीलाही इतकीच गर्दी होईल. तेव्हा मी म्हणालो की, २५ हजार तर येतीलच. प्रत्यक्ष आकड्यांनी मला चूक ठरवले. तो मद्य व्यापारीच खरा ठरला. उसळलेली गर्दी पाहून वाटले की कसोटी क्रिकेटलाही रॉक बँडसारखी रीघ लागेल. मात्र, हा क्षणैक उत्साह की पाच
दिवसांच्या ‘क्रिकेटदर्शना’चे धैर्य, हेही पाहणे महत्त्वाचे.
दिवस-रात्र क्रिकेट ही कॅरी पॅकर यांची देण
दिवस-रात्र क्रिकेट ही कॅरी पॅकर यांची देण आहे. ३७ वर्षांपासून हा डे-नाइट क्रिकेटचा सिलसिला सुरू आहे. दिवस-रात्र वनडेचा पहिला चेंडू टाकण्याचे श्रेय लिन पास्कोचे. कॅरी पॅकर जागतिक क्रिकेट मालिकेत पहिल्या षटकाचा पहिला चेंडू त्याने बॅरी रिचर्डसला टाकला. तेव्हापासून आजपर्यंत एकदिवसीय आणि टी-२० सामनेही दिवस-रात्र खेळले जाऊ लागले. खेळाडू रंगीत कपडे घालून खेळतात. वनडे आणि टी-२० सामने तीन दशकांहून अधिक काळापासून दिवस-रात्र खेळले जातात. हा विचार आयसीसीने कसोटीबाबत का केला नाही, हा संशोधनाचा विषय ठरावा.
कसोटीची लोकप्रियता रसातळाला जाताच हे सामनेही अधिक रोचक व्हावेत, हे आयसीसीच्या ध्यानी आले. क्रिकेटचा मूळ गाभाच कसोटी आहे. कसोटी सामने लोकप्रिय राहिले नाहीत तर टी-२० चे वाढते प्रेम या गाभ्यालाच धक्का पोहोचवेल. त्यामुळेच आयसीसीने दिवस-रात्र कसोटीचे अस्त्र बाहेर काढले आणि त्याला भरपूर पाठिंबाही मिळाला. दिवसाच्या सामन्यात लोक कार्यालयात, उद्योगात व्यग्र असतात. मात्र, रात्री ते सामना पाहायला नक्की येतील, असा कयास. अॅडिलेडमध्ये असेच घडले. गुलाबी चेंडूबद्दलही कोणालाच हरकत नाही. क्षेत्ररक्षक, फलंदाज वा गोलंदाजानेही रंगाबद्दल आक्षेप घेतला नाही. चेंडू वळायला आणि स्विंग व्हायलाही काहीच अडसर नाही. अॅडिलेडमध्ये सुरुवातीचे दोन दिवस सामना पाहिल्यावर वाटते की, दिवस-रात्र कसोटी आणि गुलाबी चेंडूला कसोटीत चिरंतन मान्यता मिळेल.
दिवस-रात्र कसोटीला उसळलेली गर्दी हा मात्र कौतुकाचाच विषय बनला आहे. डे-नाइट कसोटीला अधिक लोकप्रिय करायचे असल्यास सकारात्मक दृष्टिकोन, आक्रमक मार्केटिंग आणि सतत विकासाचा ध्यास हवा. तरच दिवस-रात्र कसोटीला एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची लोकप्रियता लाभेल. या आयोजनामुळे कसोटी क्रिकेटमध्ये बदलाचा भास तर जरूर
होतोय. कसोटी सामने आता कंटाळवाणे न ठरता निकाल देणारे ठरतील ही आशा आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, या निर्णयाबाबत काय म्हणत आहेत खेळडू...