स्पोर्ट्स डेस्क - कराचीतील एक फास्ट बॉलर मोहम्मद अलीने एका इनिंगमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी तिला एकाही फिल्डरची मदत घ्यावी लागली नाही. त्याने 9 बॅट्समनला बोल्ड केले तर एकाला LBW आऊट केले. कराचीत होत असलेल्या या अंडर-19 तीन दिवसीय दिवसीय इंटर डिस्ट्रिक मॅचला अधिकृत दर्जा नाही.
9 ओव्हरमध्ये केवळ 12 रन...
- राइट आर्म फास्ट बॉलर मोहम्मद अली ने ही मॅच 'झोन 3' साठी खेळली.
- UBL स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अलीने 'झोन 7' टीमच्या सर्व बॅट्समनच्या विकेट घेतल्या.
- अलीने केवळ 9 ओव्ह बॉलिंग केली. त्यात त्याने 12 रन देत सर्व विकेट घेतल्या.
- ही तीन दिवसींय सामन्यांत सर्वात किफायतशीर गोलंदाजी ठरली.
- अलीच्या टीमने ही मॅच इनिंग आणि 195 रनने जिंकली.
चार पाकिस्तानी प्लेयर्सचा कारनामा
- फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार पाकिस्तानी प्लेयर्सने एका इनिंगमध्ये 10 विकेट घेतल्याचा पराक्रम केला आहे.
- नईम अख्तर, शाहीद मेहबूब, इमरान आदील आणि जुल्फिकार बाबर यांनी हा कारनामा केला आहे.
कुंबळेने 17 वर्षांपूर्वी केला विक्रम
- टेस्टमध्ये 60 वर्षांच्या एका इनिंगमध्ये असा कारनामा करणारा इंग्लंडचा जिम लेकर होता. त्याने 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 10 विकेट घेतल्या होत्या.
- विशेष म्हणजे त्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्येही जिम लेकरने 9 विकेट घेतल्या होत्या.
- कुंबळेने 1999 मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानच्या विरोधात दुसऱ्या इनिंगमध्ये 74 रन देत सर्व 10 विकेट घेतल्या होत्या.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)