आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोटाच्या दखापतीमुळे कर्ण शर्मा संघातून बाहेर, झिम्बॉब्वे दौर्‍यावर 14 खेळाडू जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - झिम्बॉब्वे दौऱ्या आधीच भारतीय क्रिकेट संघाला एक धक्का बसला आहे. लेग स्पिनर कर्ण शर्माच्या उजव्या हाताचे बोट तुटल्यामुळे त्याला या दौऱ्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या ऐवजी कोणाला संधी मिळणारे हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे टीम इंडिया 14 खेळाडूंना घेऊनच दौऱ्यावर जाणार आहे.

बीसीसीआयने ट्विटरवर दिली माहिती
10 जुलै पासून सुरु होणाऱ्या झिम्बॉब्वे दौऱ्यावर कर्ण शर्मा जाणार नसल्याच्या वृत्ताला बीसीसीआयने ट्विट करुन दुजोरा दिला आहे. बोटाला दुखापत झाल्याने कर्ण शर्मा झिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यावर अजिंक्य राहाणे टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियात तीन वनडे आणि दोन टी 20 सामने खेळणार आहे.

झिम्बॉब्वे दौऱ्यावर अशी असेल टीम इंडिया
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायुडू, मनोज तिवारी, केदार जाधव, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, हरभजन सिंह, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा आणि संदीप शर्मा.