आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karunaratne Hits Century In Third Test Against Pakistan

तिसरी कसाेटी : करुणारत्नेचे शानदार शतक, श्रीलंका ८ बाद २७२

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्लेकल - श्रीलंकेचा सलामीवीर दिमूथ करुणारत्नेने (१३०) पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या अाणि निर्णायक कसाेटीत शानदार शतक झळकावले. याच शतकामुळे श्रीलंकेला पहिल्या डावात शुक्रवारी पहिल्या दिवसअखेर ८ बाद २७२ धावा काढता अाल्या.

या वेळी करुणारत्नेने अापल्या करिअरमध्ये दुसरे कसाेटी शतक ठाेकले. त्याने २३० चेंडूंचा सामना करताना १४ चाैकारांच्या अाधारे १३० धावा काढल्या. त्याने संयमी खेळीच्या बळावर श्रीलंकेच्या धावसंख्येला गती दिली. मात्र, या वेळी त्याला साथ देणाऱ्या फलंदाजांना फार काळ अाव्हान कायम ठेवता अाले नाही. तब्बल ७८ षटके मैदानावर खेळणारा करुणारत्ने संघाची धावसंख्या २४८ असताना बाद झाला. त्याला या वेळी थरंगाची महत्त्वाची साथ मिळाली. कुमार संगकाराच्या जागी थरंगाला खेळण्याची संधी मिळाली. या वेळी त्याने संधीचे साेने केले. शिवाय, थरंगाने करुणारत्नेसाेबत दुसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी केली. त्याने वैयक्तिक ४६ धावांची खेळीही केली. त्याने ९२ चेंडूंत ही धावसंख्या उभी केली. याशिवाय त्याने संघाचा डाव सावरला.

मात्र, या वेळी सलामीवीर काैशल सिल्वा ९, थिरिमाने ११ अाणि कर्णधार मॅथ्यूजने ३ धावांची खेळी करून तंबु गाठला. हे सर्वच खेळाडू सपशेल अपयशी ठरले.