आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:शतकानंतर केदारचा 'दबंग स्‍टाईल' डान्‍स, म्‍हणतो 'मी सलमानचा फॅन'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शतकानंतर केदार जाधवने दबंग स्‍टाईल डान्‍स केला. - Divya Marathi
शतकानंतर केदार जाधवने दबंग स्‍टाईल डान्‍स केला.
झिम्‍बाब्‍वे विरोधातील तीन वनडे मॅच सिरीजच्‍या शेवटच्‍या सामन्‍यात केदार जाधव ने 110 चेंडूमध्‍ये नॉट आऊट 105 धावा काढून करियरमधील पहिले शतक पूर्ण केले. त्‍यामध्‍ये त्‍याने 12 चौकार आणि 1 छटकारही लगावला. त्‍याच्‍या या दमदार फलंदाजीचे क्रिकेटविश्‍वात कौतूक होत आहे.
जाधवचा दबंग स्‍टाईल डांस
शतक पूर्ण झाल्‍यानंतर केदार जाधव प्रचंड उत्‍साहात होता. या उत्‍साहाच्‍या भरात त्‍याने बॉलीवुड स्‍टार सलमान खान सारखा दबंग स्‍टाईल डांसही केला. त्‍याचा हा आनंद पाहून ड्रेसिंग रूममध्‍ये बसलेले खेळाडू हसायला लागले. हरभजननेही जाधवच्‍या आनंदात सहभागी होत पवेलियनमध्‍ये डान्‍स केला.
'मी सलमानचा सुपर'
मॅच संपल्‍यानंतर केदारला त्‍याच्‍या या डान्‍सबद्दल विचारले असता तो म्‍हणाला, 'मी सलमान खानचा सुपर फॅन आहे. मी त्‍याच्‍या डान्‍सच्‍या स्‍टाईलचा दिवाना आहे. मी असा विचार करत होतो की, मला जर संधी मिळाली तर, मी ही त्‍याच्‍यासारखा डांस करेल आणि मला ती संधी मिळाली.'
पुढील स्‍लाईड क्‍लिक करून पाहा, विजयचाही डान्‍स आणि इतर फोटो..