मुंबई- इंग्लंडचा स्टार बॅट्समन राहिलेला केविन पीटरसनने आपल्याच देशातील पेस बॉलर टेमल मिल्सला आयपीएल ऑक्शनमध्ये 12 कोटी मिळाल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पीटरसनने थेट काही म्हटले नाही पण मिल्सचे नाव घेऊन म्हटले की, फक्त टी-20 फॉर्मेट खेळणा-या प्लेयरला 12 कोटी रूपयांना खरेदी केले जाणे हे वास्तव खरंच कसोटी क्रिकेटला बसलेली चपराकच आहे. जगभरातील लीग क्रिकेट खेळणारा पीटरसन यंदा आयपीएलमध्ये दिसणार नाही. आणखी काय म्हटले पीटरसनने...
- सोमवारी आयपीएल 2017 चा ऑक्शन झाले. यात इंग्लंडच्या बेन स्टोक्सला 14.50 कोटी रूपये तर त्याच्याच देशाच्या मिल्सला 12 कोटीला खरेदी करण्यात आले.
- खास बाब म्हणजे या दोघांना आपल्या बेस प्राईजपेक्षा खूपच जास्त रक्कम मिळाली.
- पीटरसनने बेन स्टोक्सबाबत काहीही म्हटले नाही मात्र, टेस्ट क्रिकेटच्या निमित्ताने त्याने निशाणा साधला.
- पीटरसनने मंगळवारी काही ट्वीट केली. एका ट्वीटमध्ये तो म्हणतो, हा कसोटी क्रिकेटच्या तोंडावर मारलेला चपराक आहे. इंग्लंडचा टी-20 टीमचा स्पेशिलिस्ट सर्वात श्रीमंत प्लेयर बनला आहे.
- दुस-या टि्वटमध्ये तो म्हणतो, यात मी मिल्सला दोषी धरत नाही. कारण त्याने मेहनतीने हे यश मिळवले आहे. मात्र, कसोटी क्रिकेट आता मागे पडले आहे. आयसीसीने यावर लागलीच लक्ष देण्याची गरज आहे.
- मिल्सवर केलेल्या टि्वटबाबत आपण काहीतरी चूक केल्याचे लक्षात येताच पीटरसन आणखी टि्वट केले. यात तो म्हणतो, मिल्स खूपच चांगला बॉलर आहे. त्याला जे मिळाले त्या योग्यतेचा तो आहेच. मिल्सला चार वर्षापूर्वीच इंग्लंड संघात स्थान द्यायला पाहिजे होते.
कोण आहे टेमल मिल्स?
- टेमल मिल्स इंग्लंडकडून फक्त टी-20 क्रिकेट खेळतो. या फॉर्मेटमध्ये तो इंग्लंडचा सध्याच्या घडीचा सर्वोत्तम बॉलर मानला जातो.
- 140 KMPH पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करणा-या मिल्सकडे बॅंकहॅंड स्लोअर वन टाकण्याची क्षमता आहे.
- इंग्लंडचा हा बॉलर वेगाच्या बाबतीत कॅसिगो रबाडा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मिशेल स्टार्क यांच्या पंक्तीत बसतो.
- दोन वर्षापूर्वी मिल्ससोबत एक ट्रॅजेडी झाली. त्याच्या स्पायनल कॉर्ड आणि वर्टिब्रे जवळ आले. त्यामुळे पाठीचे दुखणे लागले.
- डॉक्टरांनी इशारा दिला होता की, जर तो अशीच वेगवान गोलंदाजी करत राहिला तर त्याचा आजार बळावेल.
- मिल्सने खेळणे सोडले नाही. मात्र, कसोटी क्रिकेट सोडून तो आता फक्त वनडे आणि टी-20 खेळू लागला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पीटरसनने केलेल्या ट्वीट्सचे स्क्रीन शॉट्स...