आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : किंग्ज पंजाबकडून दिल्ली टीमचा धुव्वा, दिल्लीचा चाैथा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - मुरली विजयच्या (२५) नेतृत्वाखाली किंग्ज इलेव्हन पंजाब टीमने शनिवारी अायपीएल-९ मध्ये विजय मिळवला. पंजाबने घरच्या मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ९ धावांनी मात केली. स्टेनाेईसच्या (५२ धावा, ३ विकेट) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पंजाबने सामना जिंकल. पंजाबचा हा तिसरा विजय ठरला.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ५ बाद १८१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात दिल्ली टीमला ५ गड्यांच्या माेबदल्यात १७२ धावांपर्यंत मजल मारता अाली. दिल्लीकडून डिकाॅक (५२) व सॅमसनने (४९) केलेली खेळी व्यर्थ ठरली.

तत्पूर्वी, कर्णधार मुरली विजय (२५) व स्टेनाेइसने (५२) संघाला ४५ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. साहाने ५२ धावांची खेळी करून पंजाबच्या धावसंख्येला गती दिली. ग्लेन मॅक्सवेल १६, डेव्हिड मिलरने नाबाद ११ व अक्षर पटेलने नाबाद १६ धावांचे याेगदान दिले. माेरिसने दाेन, शमी, जहीर खानने प्रत्येकी एक गडी बाद केला.

स्टेनाेइस, साहा चमकले
पंजाबकडून सलामीवीर स्टेनाेइस (५२) अाणि वृद्धिमान साहा (५२) चमकले. त्यांनी दिल्लीविरुद्ध शानदार अर्धशतके ठाेकली. साहाने ३३ चेंडूंत सात चाैकारांच्या अाधारे ५२ धावांची खेळी केली. स्टेनाेइसने ४४ चेंडूंत ५२ धावा काढल्या.
सामन्यातील इतर फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...