हरभजनसिंग नंतर आता टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचा बोहल्यावर चढण्याचा नंबर आहे. 29ऑक्टोबरला म्हणजेच हरभजनच्या लग्नाच्या दिवशीच हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. रोहित रितिकाबरोबर 13 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकताच तो टेस्ट सीरीजमधून मिळालेल्या ब्रेक मध्ये रितिकाबरोबर डिनर डेटवरही गेला होता. फार थोड्या लोकांना माहित असेल की, अज कोट्यावधींचा मालक असलेला रोहित कधीकाळी फार बिकट परिस्थितीत घर चालवत होता. अम्ही
आपल्याला सांगत आहोत रोहित शर्माच्या फॅमिली बॅकग्राउंड आणि फॅमिली मेंबर्सच्या संदर्भात.
वडिल- गुरुनाथ शर्मा
गुरुनाथ शर्मा साधारणपणे 58 वर्षांचे आहेत. ते काही वर्षांपूर्वी ट्रांसपोर्ट कंपनीत काम करत होते. मात्र काही कारणांमुळे त्यांना नौकरी सोडावी लागली. तेव्हा गुरुनाथ यांचे संपूर्ण कुटुंब रोहितच्या कमाई वर आणि त्यांच्या काही सेविंगवर अवलंबून होते. तेव्हा रोहित इंडियन ऑईलसाठी आणि रणजी सामन्यात खेळत होता. 2007 मध्ये रोहितने टी-20 च्या आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये शटकार मारून 50* धावा पूर्ण केल्या. हा क्षण त्याच्या वडिलांसाठी सर्वात सुखद होता.
आई: पौर्णिमा शर्मा
आपला मुलगा स्टार क्रिकेटर झाल्याचे पाहून आई जाम खुश आहे. एकवेळ अशी होती की रोहितने क्रिकेटमध्ये जाऊच नये असे त्यांना वाटे. कारण तेव्हा रोहितचे अभ्यासापेक्षा खेळावरच जास्त लक्ष होते. मात्र रोरितच्या जिद्दिपूढे आईलाही नमते घ्यावेच लागले आणि आता रोहितची आई क्रिकेट एन्जॉय करते. रोहितने ऑलराउंडर व्हावे असे त्यांना वाटते.
भाऊ- विशाल शर्मा
विशाल रोहितपेक्षा छोटा आहे. त्याने हॉटेल मॅनेजमेन्टचा कोर्स पूर्ण केला आहे.
होणारी पत्नी- रितिका सजदेह
28 वर्षांची रितिका व्यवसायाने स्पोर्ट्स मॅनेजर आहे. ती रोहिला मागील 6 वर्षांपासून ओळखते. रितिकाला रोहितने एप्रिल 2015 मध्ये मुंबईच्या एका स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रपोझ केले होते. हा तोच क्लब आहे. जेथे रोहितने 11 वर्षांच्या वयातच क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती.
शाळेत असतांनाच पडला होता प्रेमात- हे होते पहिले प्रेम
रितिकाच्या आधी रोहितचे नाव अनेक मुलींशी जोडले गेले आहे. वर्ल्ड कप 2015 च्या वेळी रोहितला ऑस्ट्रेलियामध्ये एका मुली बरोबर फिरतांना पाहिले गेले होते. मात्र ती कोण आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. पहिल्यांदा रोहितचे शाळेतील एका मुलीवर प्रेम जडले होते. मुंबई येथील बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूलमध्ये शिकलेल्या रोहितने 11वीत असताना क्लासमध्ये एका मुलीला प्रपोज केले होते. हे रिलेशनशिप साधारणपणे 2 वर्षांपर्यंत चालले. शेवटी त्याच्या गर्लफ्रेंडनेच हे नाते संपुष्टात आणणेच्या निर्णय घेतला.
ब्रिटिश मॉडेलबरोबरही जोडले गेले आहे नाव
क्रिकेटमध्ये स्टार प्लेयर झाल्यानंतर रोहितचे नाव ब्रिटिश मॉडेल आणि अॅक्ट्रेस सोफिया हयातबरोबरही जोडले गेले आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये रोहितने वन डेमध्ये दुसरी डबल सेंच्युरी फटकावल्यानंतर सोफियाने रोहितला डेडिकेट करत तिचा न्यूड फोटोही ट्विटरवर शेअर केला होता. मात्र या रिलेशनशिपवर दोघांकडूनही कधीच काही स्टेटमेन्ट आले नाही.
रोहित शर्माशी संबंधित काह फॅक्ट्स
- 30 एप्रिल, 1987 ला नागपुर (महाराष्ट्र) मध्ये जन्म.
- 12वी पर्यंत शिक्षण, क्रिकेटमध्ये सिलेक्शन झाल्याने महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले.
- रिकांपणात गाणे ऐकणे आणि इनडोर गेम्स खेळायचा छंद.
- फेव्हरिट क्रिकेटर सचिन तेंडुलकर.
- फेव्हरिट फिल्म वीर-जारा.
- फेव्हरिट फूड चायनीज.
पुढील स्लाइड्सवर पाह, रोहित शर्माचे कुटुंब आणि पर्सनल लाइफचे काही खास PHOTOS...