आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Kohali First And Jasprit Bumrah Reaches Second Position In Latest ICC T20I Rankings

विराट काेहली अव्वल, बुमराह दुसऱ्या स्थानी, अायसीसी टी-२० ची क्रमवारी जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारताचा स्टार याॅर्करमॅन नावाने प्रसिद्ध असलेला वेगवान युवा गाेलंदाज जसप्रीत बुमराहने अायसीसीच्या टी-२० क्रमवारीत माेठी प्रगती साधली. त्याने गाेलंदाजीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. त्याने नुकत्याच झिम्बाव्वेविरुद्ध टी-२० मालिकेत शानदार गाेलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या. या मालिकेत त्याने ११ धावा देत ३ विकेट घेण्याची अापल्या करिअरमधील सर्वाेत्कृष्ट गाेलंदाजी केली.

फलंदाजीत विराट काेहली हा अव्वल स्थानावर कायम अाहे. यामध्ये अाॅस्ट्रेलियाचा अॅराेन फिंच हा दुसऱ्या स्थानावर अाहे. झिम्बाव्वेविरुद्धची टी-२० मालिका सुरू हाेण्यापूर्वी बुमराह हा ६४६ गुणांसह क्रमवारीत सातव्या स्थानावर हाेता. मात्र, मालिकेनंतर त्याने ७४४ गुणांसह दुसरे स्थान गाठले. त्याने दुसऱ्या सामन्यात ११ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. यासह त्याला ७५१ रेटिंग गुणांचा फायदा झाला. वेस्ट इंडीज संघाचा सॅम्युअल्स बद्री ७९० गुणांसह गाेलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर अाहे.
बातम्या आणखी आहेत...