आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kohali Says Indian Players Read For The Third Test

टीमचे खेळाडू जबाबदारीसाठी सज्ज, काेहलीने सांगितले फलंदाजीचा क्रम निश्चित नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टीम इंडियामध्ये काेणत्याही खेळाडूचा फलंदाजीचा क्रम निश्चित नाही. सर्वच खेळाडू परिस्थितीनुसार अापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतात. टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू हा जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज असताे, अशी प्रतिक्रिया भारतीय कसाेटी टीमचा कर्णधार विराट काेहलीने दिली.
याशिवाय त्याने अागामी दक्षिण अाफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसाेटीपूर्वीच टीममधील फलंदाजीबाबतची व्यूहरचना स्पष्ट केली. येत्या २५ नाेव्हेंबरपासून भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला नागपूर येथे सुरुवात हाेत अाहे. चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान भारताने १-० ने अाघाडी मिळवली. बंगळुरू येथील दुसरी कसाेटी पावसामुळे ड्राॅ झाली.

‘अामच्या संघामध्ये फलंदाजीचा काेणताही क्रम निश्चित नाही. प्रत्येक खेळाडू प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज अाहे. त्यामुळे गरजेनुसार त्या त्या खेळाडूंना याेग्य वेळी संधी दिली जाते. हीच अामच्या संघाची सकारात्मक अशी बाजू अाहेे,’असेही विराट काेहली म्हणाला. त्यामुळे याेग्य प्रकारे डावपेच यशस्वी हाेत असल्याचे त्याने सांगितले.

मिश्रा नव्हे, बिन्नीची गरज : अामच्या टीममध्ये लवचिकता अाहे. अाम्हाला बंगळुरू कसाेटीत अमित मिश्राला मैदानावर उतरण्याची गरज नव्हती. त्याने गत काही महिन्यांमध्ये चांगली गाेलंदाजी केली. मात्र, परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय त्यालाही पटला. त्यामुळे अाम्ही स्टुअर्ट बिन्नीला सामन्यात खेळवले, असेही काेहलीने या वेळी सांगितले.

स्टेनच्या जागी मर्चंट डि लँजला पाचारण
डेल स्टेन या वेगवान गोलंदाजाच्या फिटनेस समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून, दक्षिण आफ्रिकेने मर्चंट डि लँज या ताशी १५० किमी वेगापर्यंत चेंडू फेकण्याची क्षमता असणाऱ्या गोलंदाजाला भारतात पाचारण केले आहे. मांडीच्या स्नायूच्या दुखापतीमुळे डेल स्टेन भारताविरुद्ध उर्वरित दोन्ही कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. दक्षिण आफ्रिकेकडे मॉर्केल, रबाडा आणि अॅबोट हे तीनच फिट वेगवान गोलंदाज सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे तिसऱ्या क्रिकेट कसोटीसाठी मर्चंट डि लँजला भारतात पाठविण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने घेतला.