आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेरा पाहताच कोहलीने लपवला चेहरा, अनुष्कासह परतला होता गोव्याहून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई एयरपोर्टवर गोव्याहून परतल्यानंतर विराट आणि अनुष्काचा सामना माध्यमांच्या कॅमऱ्याशा झाला. विराट कोहलीने बॅगच्या सहाय्याने आपला चेहरा लपवला होता. हा प्रकार पाहून अनुष्काला हंसू अवरेना. - Divya Marathi
मुंबई एयरपोर्टवर गोव्याहून परतल्यानंतर विराट आणि अनुष्काचा सामना माध्यमांच्या कॅमऱ्याशा झाला. विराट कोहलीने बॅगच्या सहाय्याने आपला चेहरा लपवला होता. हा प्रकार पाहून अनुष्काला हंसू अवरेना.
नागपुर/मुंबई- भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर 25 ते 29 नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रविवारी टीम इंडिया नागपूर येथे पोहोचली. नागपूरला पोहोचण्या आधी टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासह मुंबई एअरपोर्टवर दिसले. हे दोघेही गोव्याहून येत होते. माध्यमांच्या कॅमेऱ्यावर लक्ष पडताच कोहलीने बॅगने चेहरा लपवला. मात्र नंतर, स्वतःहूनच समोर येत फोटो काढून घेतले. भारतीय खेळाडू वेगवेगळ्या शहरातून नागपुरला पोहोचले आहेत.
याआधी भारतीय संघाचे डायरेक्टर रवि शास्त्रीदेखील आले. भारतीय संघ मंगळवारी दुपार नंतर जामठा स्टेडियमवर प्रॅक्टिस सेशनसाठी भाग घेईल. तर सकाळच्या सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकन संघ नेटवर सराव करताना दिसेल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, नागपूरला पोहोचलेल्या टीम इंडियाचे खास PHOTOS....