आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICC टी-२० क्रमवारी: चहलची प्रगती; काेहली अव्वल, बुमराहची दुसऱ्या स्थानावर धडक!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या अाणि निर्णायक टी-२० सामन्यात विकेटचे षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या यजुवेंद्र चहलने अायसीसीच्या क्रमवारीमध्ये माेठी प्रगती साधली. त्याने गाेलंदाजीच्या क्रमवारीत ८६ व्या स्थानावर धडक मारली. त्याने क्रमवारीमध्ये ९२ स्थानांनी प्रगती साधली अाहे. त्याने बंगळुुरूच्या मैदानावरील तिसऱ्या सामन्यात २५ धावा देताना ६ बळी घेतले.  गुरुवारी अायसीसीने टी-२० ची क्रमवारी जाहीर केली. 
 
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने फलंदाजीमधील अापले अव्वलस्थान कायम ठेवले अाहे. दुसरीकडे गाेलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह चमकला. त्याने क्रमवारीत दुसरे स्थान गाठले. त्याने अापल्या करिअरमधील सर्वाेत्कृष्ट स्थान गाठले.  

विराट काेहलीने मालिकेमध्ये २, २१ अाणि २९ धावांची खेळी केली. मात्र, त्याने अापले क्रमवारीतील अव्वलस्थान कायम ठेवले. त्याचे रेटिंगमध्ये २१ गुणांनी नुकसान झाले. त्याच्या नावे अाता ७९९ गुण झाले अाहेत. त्यापाठाेपाठ अाॅस्ट्रेलियाचा अॅराेन फिंच अाणि मॅक्सवेल दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर अाहेत. 
  
फलंदाजीमध्ये भारताच्या अनेक प्रतिभावंत खेळाडूंना क्रमवारीमध्ये प्रगती साधता अाला. सलामीवीर लाेकेश राहुलने १५ स्थानांनी प्रगती साधली. त्याने १५ वे स्थान गाठले. यापूर्वी ताे ३० व्या स्थानावर हाेता. सुरेश रैनाने संयुक्तपणे २४ व्या स्थानावर धडक मारली. माजी कर्णधार धाेनीने ३८ वे स्थान गाठले.  
 
मालिकेमध्ये सर्वाधिक १२६ धावा काढणाऱ्या इंग्लंडच्या ज्याे रुटने पाचवे स्थान गाठले.  इंग्लंडचा कर्णधार इयान माेर्गनने ११ वे स्थान गाठले. त्याने तीन स्थानांनी प्रगती केली. हार्दिक पंड्याने ९२ वे अाणि अाशिष नेहराने २४ व्या स्थानावर धडक मारली.   

युवराजची घसरण : भारताचा स्फाेटक फलंदाज युवराज सिंगला क्रमवारीत फटका बसला. त्याचे एका स्थानाने नुकसान झाले. त्याची ४३ व्या स्थानावर घसरण झाली. त्याला इंग्लंडविरुद्ध मालिकेमध्ये समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्यामुळे त्याला क्रमवारीमध्ये प्रगती करता अाली नाही.  

जसप्रीत बुमराह चमकला 
भारताचा युवा गाेलंदाज जसप्रीत बुमराहने गाेलंदाजीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. त्याने तिसऱ्या अाणि शेवटच्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे तीन गडी बाद केले. याचा त्याला क्रमवारीत फायदा झाला. त्यामुळे त्याने करिअरमध्ये सर्वाेत्कृष्ट स्थान गाठले. अाता त्याच्या नावे  ७३५ गुण झाले अाहेत. त्याला क्रमवारीत २९ गुणांचा फायदा झाला. त्याने इंग्लंडविरुद्ध मालिकेतील तीन सामन्यांत एकूण अाठ विकेट घेतल्या. 

भारतीय संघ दुसऱ्या स्थानी 
इंग्लंडविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका जिंकून टीम इंडियाने संघाच्या क्रमवारीमधील दुसरे स्थान कायम ठेवले. भारताला या मालिका विजयाने एका गुणांचा फायदा झाला. त्यामुळे अाता भारतीय संघ अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंडपासून अवघ्या पाच गुणांनी पिछाडीवर अाहे.  
बातम्या आणखी आहेत...