आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता ध्येयपूर्तीची याेग्य वेळ : कोहली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - भारतीय संघाने शिकण्याची प्रक्रिया अाता बऱ्यापैकी पूर्ण केली असून यापुढचा काळ हा ध्येयपूर्तीचा राहणार अाहे. पराभवानंतरचे विजय माेजत बसण्याचा काळ मागे पडला असून अाता विजयासाठीच खेळण्याचे लक्ष्य असल्याचेही काेहलीने नमूद केले.

बांगलादेशात १० जूनपासून प्रारंभ हाेत असलेल्या क्रिकेट मालिकेच्या पार्श्वभूमीवर काेहली बाेलत हाेता. अाता शिकण्याच्या मानसिकतेने खेळण्याची गरज नाही. अाम्ही सर्व सहकारी अाता बरेच काही शिकलाे असून अगदी टीव्हीवरील मॅच पाहूनदेखील शिकलाे अाहाेत. अाता संघातील बहुतांश खेळाडूंना बऱ्यापैकी अनुभवदेखील असल्याने अाता संघ म्हणून काही उद्दिष्ट गाठण्यासाठीच खेळायचे असल्याचे काेहलीने सांगितले.
कसाेटीसाठीवेगळा विचार : टी-२०अाणि एकदिवसीय सामन्यांच्या तुलनेत कसाेटीसाठी वेगळा विचार अाणि वेगळ्या क्लृप्त्या कराव्या लागतात. अर्थात प्रत्येक जण अापले काम करतानाच अधिकाधिक शिकत असताे, असेही काेहलीने सांगितले.
वैयक्तिकलक्ष्याला नाही महत्त्व : संघाचाकर्णधार म्हणून खेळताना वैयक्तिक लक्ष्य साध्य करण्याला मी कधीही महत्त्व देत नाही. कर्णधार म्हणून संघाची कामगिरी चांगली हाेणे हेच अामचे लक्ष्य राहणार अाहे. प्रत्येक सामना जिंकणे हेच अाम्ही ध्येय ठरवले आहे, असेही या वेळी विराट काेहलीने नमूद केले