आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ICC रँकिंगमध्ये विराट प्रथमच टॉप 5 मध्ये, वनडे-टी-20 मध्ये अव्वल स्थान कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत १६७ आणि ८१ धावांची खेळी करणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप-५ मध्ये धडक दिली आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत कोहली ८२२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम क्रमवारी आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टिवन स्मिथ पहिल्या तर इंग्लंडचा जो. रुट दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यम्सन (८३८) तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा आणखी एक फलंदाज चेतेश्वर पुजारानेसुद्धा टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे. पुजारा ७६८ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. त्याचा एका स्थानाने फायदा झाला. भारताचा अजिंक्य रहाणेचे तीन स्थानांनी नुकसान झाले. तो ११ व्या क्रमांकावर घसरला आहे.

८०० गुणांचा डोंगर ओलांडणारा ११ वा भारतीय फलंदाज : मागच्या आठवड्यात कोहलीचे ७२५ गुण होते. विशाखापट्टणम येथे पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकल्याने त्याला ९७ गुणांचा फायदा झाला. कोहलीने करिअरमध्ये पहिल्यांदा ८०० गुणांचा डोंगर पार केला. ८०० गुणांचा टप्पा ओलांडणारा कोहली भारताचा ११ वा फलंदाज ठरला.

तिन्ही स्वरूपात टॉप-५ मध्ये
कोहली क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात टॉप-५ मध्ये सामील झाला आहे. कसोटीत चौथ्या स्थानी असलेला विराट कोहली टी-२० मध्ये ८२० गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर वनडेत त्याचे ८४८ गुण असून, तो द. आफ्रिकेच्याडिव्हिलर्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॉप-५ कसोटी फलंदाज
०१. स्टिवन स्मिथ, ऑस्ट्रेलिया ८९७
०२. जो. रुट, इंग्लंड ८४४
०३. केन विल्यम्सन, न्यूझीलंड ८३८
०४. विराट कोहली, भारत ८२२
०५. हाशिम आमला,द. आफ्रिका ८०९

टॉप-५ कसोटी गोलंदाज :
०१. आर. अश्विन, भारत ८९५
०२. रंगना हेराथ,श्रीलंका ८६७
०३. डेल स्टेन, द. आफ्रिका ८५२
०४. जेम्स अँडरसन, इंग्लंड ८५०
०५. स्टुअर्ट ब्रॉड, इंग्लंड ८२०
अश्विन टॉपवर; जडेजा सहाव्या क्रमांकावर
गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा आॅफस्पिनर आर. अश्विन ८९५ गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. दुसऱ्या कसोटीत ८ बळी घेणाऱ्या अश्विला १४ गुणांचा फायदा झाला. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर आहे. विशाखापट्टणम येथे ३ गडी बाद करणारा मो. शमी पाच स्थानांच्या प्रगतीसह २१ व्या क्रमांकावर आला आहे. अश्विन फलंदाजांंत ४३ व्या आणि अष्टपैलूंच्या यादीत अव्वलस्थानी आहे.
बातम्या आणखी आहेत...