आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाकडून ईडन गार्डनची स्वच्छता, अनुराग ठाकूर-विराटच्या हाती झाडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वच्छ भारत अभियानाच्या दुस-या वर्षपूर्तीनिमित्त कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी हातात झाडू घेतला. - Divya Marathi
स्वच्छ भारत अभियानाच्या दुस-या वर्षपूर्तीनिमित्त कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी हातात झाडू घेतला.
कोलकाता- टीम इंडियाने रविवारी गांधी जंयतीच्या निमित्ताने कोलकात्यातील ईडन गार्डनची साफसफाई केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या दुस-या वर्षपूर्तीनिमित्त कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी हातात झाडू घेतला. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूरही उपस्थित होते. त्यांनाही झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. कोणी कोणी घेतला सहभाग...
- अनुराग ठाकूर यांनी आपल्या टि्वटर अकाऊंटवर याबाबतचा व्हिडिओ शेयर केला आहे.
- यात टीम इंडियाचे खेळाडू रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारासह इतर खेळाडू व कर्णधार विराटही सहभागी झाला होता.
- टीम इंडियाचे हेड कोच अनिल कुंबळे यांनीही यात सहभाग नोंदवला.
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची रविवारी 150 वी जयंती होती.
- स्वच्छतेबाबत महात्मा गांधींचे विचार सर्व जगाला माहित आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, ईडन गार्डनवरील स्वच्छतेबाबतची क्षणचित्रे आणि व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...