आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ, तू नेहमीच माझा कॅप्टन असशील: धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटचे टि्वट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटने 2008 मध्ये वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. - Divya Marathi
विराटने 2008 मध्ये वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता.
नवी दिल्ली- विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीबाबत बोलताना म्हटले आहे की, धोनी भाऊ तू माझा कायमच कॅप्टन राहशील. आपल्याला माहित असेलच की, 4 जानेवारी रोजी धोनीने वन-डे आणि टी- 20 चे कर्णधारपद सोडले होते. मात्र, या दोन्ही फॉर्मेटमध्ये तो क्रिकेट खेळत राहणार आहे. इंग्लंडविरूद्ध आता याच महिन्यात होणा-या वन-डे आणि टी 20 सीरीजसाठी धोनी उपलब्ध असेल. काय म्हटले विराटने...
 
- विराट कोहलीने शुक्रवारी टि्वट करताना म्हटले की, "एक असा लीडर असल्याबाबत तुझे आभार. ज्याच्या आसपास नेहमीच यंगस्टर्स राहणे पसंत करतील. एमएस धोनी भाऊ तू नेहमीच माझा कॅप्टन असशील."
- विराटने 2008 मध्ये वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. तेव्हापासून तो धोनीच्या नेतृत्त्वाखाली वनडे क्रिकेट खेळत आला आहे.
- कपिल देवने म्हटले आहे की, " हा पॉजिटिव विचार आहे. ही देशाच्या प्रती विचार आहे नव्या चेह-यांना संधी देण्याचा धोनीचा यामागे हेतू दिसतो. या निर्णयाबाबत धोनीला सॅल्यूट ठोकला पाहिजे. " 
- "जर धोनीने हाडिसीजन घेतला आहे तर त्याच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे."
- "टेस्ट कॅप्टन्सी सोडताना त्याने म्हटले होते ती, नवे खेळाडू आले आहेत आणि आपण त्यांना संधी दिली पाहिजे."
-" हा निर्णय सुद्धा धोनीने त्याच भावनेतून घेतला असेल असे कपिल देव यांनी म्हटले आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, धोनीबाबत काय म्हटले आहे विराट, अश्विनने...
बातम्या आणखी आहेत...