आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kohli When Was Asked About His Patch Up With Anushka

अनुष्कासोबतच्या रिलेशनवर विराट म्हणाला- तुम्हाला सांगण्याची गरज नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विराट कोहलीने अनुष्का शर्मासोबतच्या रिलेशनवरील प्रश्नांना उत्तर देणे टाळले. येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या विराटला अनुष्कासोबतच्या रिलेशनबद्दल विचारण्यात आले. तो म्हणाला, 'त्याबद्दल तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मी त्यावर काहीच बोलणार नाही.' त्याचेवळी विराट म्हणाला, की मला फॅन्सच्या संपर्कात राहाणे वडते मात्र लिमिटबाहेर कॉमेंट केल्यानंतर वाईट वाटते.

विराटने दिला सल्ला, आपण मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे
- मुंबईतील विराट फॅनबॉक्स लॉन्चिंगवेळी सोमवारी एका पत्रकाराने विराटला अनुष्कासंबंधी प्रश्न विचारला.
- यावेळी विराटने मर्यादा ओलांडणाऱ्यांना सल्ला दिला.
- तो म्हणाला, 'फॅन्सनी त्यांची मर्यादा ओलांडून जेव्हा कॉमेंट्स केलेल्या असतात तेव्हा वाईट वाटते.'
- 'लोकांना किमान एवढे तरी कळायला हवे की ते काय लिहित आहेत. मला त्या घटनेबद्दल जे बोलायचे होते, ते आधीच बोलून झाले आहे. लोकांनाही ते आता कळाले आहे. इतर कोणाला याबद्दल जाणून घेण्याची गरज नाही.'

दोघांमध्ये पुन्हा जुळल्याचे आल्या होत्या बातम्या
- विराट आणि अनुष्का काही दिवसांपूर्वी मुंबईत सोबत दिसले होते. वांद्रे येथील एका हॉटेल-पबमध्ये डिनरसाठी ते आले होते.
- सूत्रांची माहिती आहे, की दोघांमधील दुरावा आता संपला आहे. सलमान खानने त्यांच्यात मध्यस्थी करत त्यांचे पॅचअप करुन दिले. ते दोघे सलमानच्या घरीही गेले होते.

काय झाले होते...
- टी-20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर सोशल मीडियाने अनुष्काला धारेवर धरत अनेक ट्विट केले होते. त्यावर विराटने एक ट्विट करुन नाराजी व्यक्त केली होती.
- तर, आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर अनुष्काने विराटला मॅसेज पाठवून अभिनंदन केले होते.

अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी
- इंडियातील सर्वात पॉप्यूलर सेलिब्रिटी कपलपैकी विराट-अनुष्काची लव्हस्टोरी आहे. 2013 मध्ये त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. तेव्हा एका शॅम्पूच्या अॅडमध्ये ते दोघे एकत्र आले होते
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अनुष्का-विराटचे फोटो...