आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Doors Open For Ravi Shastri? Kohlis Favourite Shastri To Apply For Only Under Condition

कोच बनण्यासाठी रांगेत उभा राहणार नाही, गॅरंटी देत असाल तरच अर्ज: रवी शास्त्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रशिक्षकपदाच्या रांगेत उभा राहणार नसल्याचे सांगत रवी शास्त्रींनी आपली भूमिका मांडली आहे. - Divya Marathi
प्रशिक्षकपदाच्या रांगेत उभा राहणार नसल्याचे सांगत रवी शास्त्रींनी आपली भूमिका मांडली आहे.
नवी दिल्ली- मी कोच पदासाठी रांगेत उभा राहणार नाही. मला कोच बनवण्याची गॅरंटी मिळत असेल तरच मी अर्ज करेल, असे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सुरुवातीपासून रवी शास्त्रीला कोच बनवण्याचा आग्रह धरला आहे.
 
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबतच्या वादानंतर अनिल कुंबळे यानी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेट सल्लागार समितीने नव्या कोचचा शोध सुरु केला आहे. यासाठी समितीने अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे विराटची पसंती असलेल्या रवी शास्त्री पुन्हा प्रशिक्षकपदासाठी इच्छूक आहेत का हे जाणून घेण्यासाठी ‘क्रिकेटनेक्स्ट’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता शास्त्रीने हे वक्तव्य केले आहे. 
 
रवी शास्त्री म्हणाले, मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास काहीही अडचण नाही. भारतीय संघासोबत काही काळ कामही केले आहे. त्यामुळे माझ्या कामाची पद्धत व सर्व बाबी सर्वांना माहित आहे. त्यामुळे मी नव्याने अर्ज करणार नाही. याबाबत केवळ मी केवळ बीसीसीआय आणि सचिन, गांगुली आणि लक्ष्मणचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीसोबतच चर्चा करू. तसेच या त्रयीने आपल्याला प्रशिक्षकपदी निवड करण्याची हमी दिली तरच नव्याने अर्ज करेन. प्रशिक्षकपदासाठी पुन्हा एकदा मी रांगेत उभे राहणार नाही, असेही शास्त्री स्पष्ट केले. 
 
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी यापूर्वी वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत आणि डोडा गणेश यांनी अर्ज केले आहेत. मात्र, टीम इंडियाचे माजी संचालक/व्यवस्थापक राहिलेल्या रवी शास्त्रींना या पदासाठी अधिक पसंती मिळू शकते. कारण विराट कोहलीलाही रवी शास्त्री हेच कोच म्हणून हवे आहेत. मात्र, गेल्या वर्षी प्रशिक्षक निवडीदरम्यान शास्त्री व गांगुलींचा जो वाद झाला होता त्यामुळे गांगुलीची भूमिका काय राहील यावरच बरेचसे अवलंबून राहील. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रवी शास्त्रींचीच मुख्य कोच म्हणून निवड होईल. यासाठी बीसीसीआयमधील काही पदाधिका-यांसह बाहेरची मोठी लॉबी कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...