आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीच सर्वकाही करेन, तर मग इतर प्लेयर्स काय करतील, धावा न होण्याबाबत विराटचे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडचा 75 धावांनी मोठा पराभव करत भारताने मालिका खिशात घातली आहे. पण भारताने मालिका जिंकली असली, तरी सलामी जोडी लवकर फुटणे ही समस्या मालिकेत प्रकर्षाने जाणवली आहे. विशेषतः विराट कोहली तिन्ही सामन्यात अपयशी ठरला. याबाबत जेव्हा पत्रकारांनी विराटला विचारले, तेव्हा विराट भडकला. सलामीला येऊन चांगली फलंदाजी करण्यात अपयश का येत आहे असे विचारले कोहलीला एका पत्रकाराने विचारले. त्यावर तो म्हणाला, मी आयपीएलमध्ये ओपनिंग करताना चार शतक ठोकले आहेत, त्यावेळी कोणी म्हणाले नाही. पण आता धावा करता आल्या नाहीत, तर समस्या निर्माण झाली आहे. टी ट्वेंटीच्या तिन्ही मॅचमद्ये सलामीला आलेल्या कोहलीला अवघ्या 52 धावा करता आल्या आहेत. 
 
मीच सर्व करेन तर, इतर सगळे काय करतील?
- बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या टी-20 मॅचमध्ये विराट कोहली फक्त दोन धावा करून रनआऊट झाला होता. 
- कोहली म्हणाला, आयपीएलच्या वेळी सर्व म्हणत होते की, किती कमालीची बॅटिंग आहे आणि आता दोन इनिंगमध्ये रन झाले नाही तर सगळे टीका करत आहेत. 
- कोहली पत्रकारांना म्हणाला, टीममध्ये इतर लोकांकडेही जरा लक्ष द्या. इतरही 10 लोक आहेत. जर मीच सर्वकाही केले तर इतर काय करतील. 
- इतरांनाही संधी द्या. आमच्या सर्वांसाठी ही मालिका चांगली राहिली आहे. मी त्यासाठी खूप आनंदी आहे. मला माझ्या ओपनिंगची चिंता नाही. 
- जर मी दोन मॅचमध्ये 70 धावा केल्या असत्या तर तुम्ही मला प्रश्न केला असता का, नसता केला ना? 
- टीमसाठी आनंदी राहा, सिरीज चांगली झाली, एन्जॉय करा. 

भारताने तिन्ही मालिका जिंकल्या 
- भारताने इंग्लंडला या टूरमध्ये एकही मालिका जिंकू दिली नाही. 
- टेस्ट सिरीजची पहिली मॅच ड्रॉ झाल्यानंतर पाच मॅचची सिरीज आम्ही 4-0 ने जिंकली. 
- त्यानंतर वनडे आणि टी 20 सिरीजही भारताने 2-1 ने जिंकली. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...