आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-10: काेलकात्याचा दणदणीत विजय; पंजाबवर 8 गड्यांनी मात, उमेश यादवचे 4 बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता- गाैतम गंभीरच्या (नाबाद ७२) नेतृत्वाखाली यजमान काेलकाता नाइट रायडर्सने गुरुवारी अायपीएलमध्ये शानदार विजय संपादन केला. यजमानांनी अापल्या घरच्या मैदानावर ग्लेन मॅक्सवेलच्या  पंजाबचा पराभव केला. काेलकात्याने ८ गड्यांनी सामना जिंकला. या टीमचा लीगमधील हा दुसरा विजय ठरला.

प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने निर्धारित ९ बाद १७० धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात काेलकाताने २ गड्यांच्या माेबदल्यात १६.३ षटकांत सामना जिंकला. 

गंभीर-नरेनची अर्धशतकी भागीदारी...
धावांचा पाठलाग करणाऱ्या काेलकात्याला सलामीच्या नरेन अाणि कर्णधार गाैतम गंभीरने  अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. या दाेघांनी पहिल्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केली. दरम्यान, नरेनने १८ चेंडूंत ४ चाैकार अाणि ३ षटकारांच्या अाधारे ३७ धावा काढल्या. गाैतम गंभीरने ४९ चेंडूंत ११ चाैकारांसह नाबाद ७२ धावा काढल्या. 

यजमान काेलकात्याने एेतिहासिक ईडन गार्डनवर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मैदानावर फलंदाजीसाठी अालेल्या पंजाबला सलामीवीर हाशिम अामला (२५) अाणि मनन वाेहराने (२८) दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी ५३ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. मात्र, पीयूष चावलाने  वाेहराला बाद केले. नरेनने स्टाेईनिसला त्रिफळाचीत केले. दरम्यान, हाशिम अामला २५ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.   

उमेश यादवचे चार बळी...
काेलकात्याकडून उमेश यादवने चार षटकात ३३ धावा देताना ४ विकेट घेतल्या. 
त्याने कर्णधार मॅक्सवेल (२५),मिलर (२८), साहा (२५) अाणि अक्षर पटेलला (०) बाद केले. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...