आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Anil Kumble Could Become Team Indias Director And Dravid Coach Says Reports

कुंबळे होऊ शकतो टीम इंडियाचा डायरेक्टर, द्रविडला कोचिंगची ऑफर : रिपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा कोच अनिल कुंबळेला टीम इंडियाचे डायरेक्टर पद मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कुंबळेच्या जागेवर अंडर-19 आणि टीम इंडिया-ए चा कोच राहुल द्रविड भारतीय संघाचा कोच बनू शकतो. मागील वर्षी रवी शास्त्रींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून बीसीसीआयमध्ये डायरेक्टरचे पद रिकामे आहे आणि बोर्ड पुन्हा शास्त्रींची नियुक्ती करण्याच्या विचारात नाही.

भारत-ऑस्ट्रेलिया सिरीज ठरू शकते शेवटची...
- मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय आता अनिल कुंबळेला टीमच्या डायरेक्टर पदावर बसवण्याचा विचारात आहे.
- अनिल कुंबळेसाठी कोच स्वरूपात भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज शेवटची सिरीज ठरू शकते. यानंतर राहुल द्रविड टीमच्या कोच पदावर असेल.
- बीसीसीआयच्या अॅडमिन कमिटीने कुंबळेला आपला रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत. या रिपोर्टमध्ये ज्युनिअर आणि महिला संघाचे रिपोर्टही मागवण्यात आले आहेत.

कमेटी घेणार सचिन, सौरभ आणि व्हीव्हीएस लक्ष्मणचा सल्ला
- रिपोर्ट पाहिल्यानंतर कमेटी क्रिकेट सल्लागार समितीसोबत मिटिंग करेल.
- भारतीय क्रिकेट सल्लगार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आहेत.
- बीसीसीआयने अनिल कुंबळेलाही या प्रपोजलवर विचार करण्यासाठी वेळ दिला आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, आतापर्यंत कोणकोण राहिले आहेत टीम इंडियाचे कोच...
बातम्या आणखी आहेत...