आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींचे 'क्रिकेट राज्य' खालसा, कुटुंबियांची अशी आहे अलिशान Life

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे ललित मोदींची मुलगी अलिया, उजवीकडे स्वत ललित मोदी व खाली मुलगा रूचिर मोदी... - Divya Marathi
डावीकडे ललित मोदींची मुलगी अलिया, उजवीकडे स्वत ललित मोदी व खाली मुलगा रूचिर मोदी...
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे माजी प्रमुख ललित मोदींचा राजस्‍थानमधील नागौर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्‍यक्षपदाचा राजीनामा बुधवारी मंजूर करण्यात आला. यासोबतच नागौरपासून सुरू झालेला ललित मोदींचा क्रिकेट प्रवास नागौरमधून संपला असे म्हटले पाहिजे. गेली 14 वर्षे मोदी नागौरचे प्रतिनिधित्व करत होते.
 
आपल्याला माहित असेलच जून महिन्यात ललित मोदींचा मुलगा रूचिर मोदीचा पराभव करत काँग्रेसचे नेते सीपी जोशी यांनी राजस्थान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद पटकावले होते. मात्र, नागौर जिल्हा कमिटीचे अध्यक्षपद ललित मोदींकडेच होते. मात्र, मोदींवर गैरव्यवहाराचा ठपका असल्याने बीसीसीआय व राजस्थान क्रिकेट बोर्डाने त्या जिल्ह्याची मदत रोखली होती. अखेर मोदींनी तेथीलही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला व जो बुधवारी स्वीकारला गेला.
 
तसेही आयपीएलचे माजी कमिश्नर राहिलेले ललित मोदी आपल्‍या लग्‍झरी लाइफस्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. ते देशात असतानाही मोठ - मोठ्या पाटर्यांना हजेरी लावत होते. आता विदेशातही त्‍यांच्‍या जीवनमानावर काहीच फारक पडला नाही. महागड्या कार, प्राइव्‍हेट जेट, फॉरेन ट्रिप हे सर्व त्‍यांच्‍या जीवनाचा भाग आहे. यात त्‍यांची मुलगी अलियासुद्धा कमी नाही. आपल्‍या वडिलांप्रमाणेच ती जगते. तिचे इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा स्टायलिश आणि ग्‍लॅमरस फोटोजने भरलेले आहे. divyamarathi.com सांगणार आहे आलियाच्‍या लाइफस्टाइलबद्दल...
 
मोदींनी केले आईच्‍या मैत्रिणीशी लग्‍न-
 
परदेशात शिक्षण घेत असताना ललित यांचा जीव आईची मैत्रीण मीनलवर जडला होता. मीनल ललित यांच्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी होती, तरीही दोघांमध्ये जवळीक वाढली होती.
 
मीनल प्रचंड रागावली होती-
 
मीनलने नायजेरियाचा व्‍यावसायिक जॅक सागरानीसोबत लग्न केले. या लग्नाच्या काही दिवसांपूर्वी ललितने मीनलसमोर प्रेम व्यक्त करून लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर मीनल भडकली होती. तिने तब्बल चार वर्ष ललितसोबत बोलणे बंद केले होते.
 
...आणि अखेर एक झाले ललित-मीनल
 
मीनल आणि सागरानी फार दिवस एकत्र राहू शकले नाही. दोघांचा लवकरच घटस्फोट झाला. त्यानंतर ललित आणि मीनल पुन्हा जवळ आले. त्यांच्या या नात्याला ललित यांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड विरोध झाला.
 
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, मोदींचे कुटुंबिय व मुलगी अलियाविषयी माहिती व फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...