आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींचा प्लॅन, ICC ला टक्कर देण्यासाठी तयार करणार वेगळा क्रिकेट बोर्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी क्रिकेटमध्ये पुन्हा परतण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आईसीसी प्रमाणेच एक नवीन क्रिकेट संस्था सुरू करण्याची तयीरी केली आहे. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (एबीसी) ला दिलेल्या एका मुलाखतीत ललित मोदीयांनी हा खुलासा केला आहे.

मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये आडकलेल्या मोदींनी खुलासा केला की, ते अनेक वर्षांपासून अशा प्लॅनवर काम करत आहेत. मोदींच्या मते “आम्ही वेगळ्या क्रिकेट सिस्टमची गोष्ट करत आहोत. याचे ब्लूप्रिंटदेखील तयार झाले आहे. मीही या प्लॅनिंगमध्ये सामिल होतो. या विषयावर मी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.''
क्रिकेटची दूसरी संस्थाः
मोदी नेहमीच आईसीसीच्या मॉडेल आणि कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आले आहेत. मोदींच्या मते आयसीसवर भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेट बोर्डसचा प्रभाव आहे, मात्र आम्ही क्रिकेटमध्ये एक दूसरी संस्था आनत आहोत. यासाठी काही बिलियन डॉलर्सची गरज भासणार आहे. पण ही फार मोठी समस्या नाही.

ऑलिंपिक संघकडून होईल मान्यताः
मोदींच्या क्रिकेटची ही नवीन संस्थाऑलिंपिक संघाद्वारे मान्यता प्राप्त असेल. यात आयसीसी प्रमाणेच क्रिकेटचे कॅलेंडर असेल. ज्यात टेस्ट आणि टी20 मॅच खेळवले जातील. मोदींची ही नवी संस्था 50 ओव्हरच्या वनडे मॅचसपासून दूरच रादने पसंद करणार आहे.
टी20 वर होणार मोठा प्लॅनः
मोदींनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, टेस्ट आणि टी20 ही भविष्य काळातील गरज आहे. त्यामुळे आता हेच सामने खेळवले जायला हवे. टी20 ला जगातील मोठ्या खेळांच्या कार्यक्रमांत सामिल करण्यात यावे यासठीही मोठे डावपेच आखले जात आहेत. मोदी असेही म्हणाले की, ते बर्‍याच दिवसांपासून आयसीसीबरोबर या विषयावर बोलत होते. मात्र माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलेगेले नाही. मात्र मला विश्वात आहे की, या प्लॅनची अमंलबजावनी झाली तर, क्रिकेटमध्ये नवा इतिहास लिहिला जाईल.

2013 मध्ये बीसीसीआयने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे क्रिकेटशी संबंधित राहण्यावर बंदी घातली आहे.