आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेचे 6 खेळाडू मैदानातून परतले, संतप्त कोहलीने डावच घोषित केला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदुषणामुळे श्‍वास घेण्‍यास त्रास होत आहे, अशी तक्रार श्रीलंकेच्‍या खेळाडूंनी केली. यादरम्‍यान ते मास्‍क लावून खेळले. - Divya Marathi
प्रदुषणामुळे श्‍वास घेण्‍यास त्रास होत आहे, अशी तक्रार श्रीलंकेच्‍या खेळाडूंनी केली. यादरम्‍यान ते मास्‍क लावून खेळले.

नवी दिल्ली - दिल्लीत भारत-श्रीलंका तिसऱ्या कसोटीच्या  तिसऱ्या दिवशी अजबच घडले. प्रदूषणामुळे लंकेचे ७ खेळाडू लंच ब्रेकनंतर मास्क घालून मैदानावर आले. लंकेच्या खेळाडूंमुळे पुढील ५६ मिनिटांत ४ वेळा खेळ थांबवावा लागला. २६ मिनिटे वाया गेली. १२८ व्या षटकात लंकेचा कर्णधार दिनेश चांडीमलने संघाकडे मैदानात दहाच खेळाडू उरल्याने खेळ थांबवण्याची मागणी केली. फिल्डिंगसाठी चक्क सपोर्ट स्टाफचा सदस्य लंकेची जर्सी घालून मैदानात उतरला. लंकेच्या या नाटकांमुळे संतापलेल्या कर्णधार कोहलीने रागातच डाव घोषित केला. भारताच्या खेळाडूंनी मात्र मास्क न घालताच क्षेत्ररक्षण केले.

 

लंकेची बहाणेबाजी 
१२३ वे षटक :
श्वासोच्छवासात अडचण येत असल्याचे गोलंदाज गमागे म्हणाला. १७ मिनिटे खेळ थांबला. नंतरच्या पहिल्या चेंडूवर अश्विन बाद.
१२५ वे षटक: ३ चेंडू टाकल्यानंतर गमागे परतला. पुढच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कोहली बाद झाला.
१२७ वे षटक : ५ चेडू टाकल्यानंतर लकमलही षटक सोडून तंबूत परतला.  
१२८ वे षटक: संदाकनने ५ चेंडू टाकले. कर्णधार चांडीमलने पंचांना सांगितले की आता श्रीलंकेकडे क्षेत्ररक्षणासाठी अकराही खेळाडू नाहीत, कृपया खेळ थांबवावा.

 

 


58 मिनिटांत 4 वेळेस थांबवली मॅच 
प्रथम 17 मिनिटे थांबवला खेळ , वेळ: 12.29 pm

- लंचनंतर 12:29 pm ते 12:46 pm पर्यंत श्रीलंकेच्‍या खेळाडूंनी प्रदुषणाची तक्रार केली. त्‍यामुळे मॅच थांबवावी लागली. 
- लाहिरु गमागे 122वी ओव्‍हर टाकत होते. त्‍यादरम्‍यान त्‍यांना श्‍वास घेण्‍याचा त्रास झाला. 
- दिनेश चांडीमलने पंचांशी चर्चा केली. श्रीलंकेच्‍या खेळाडूंना खराब हवेमुळे मैदानाबाहेर जायचे होते. यावेळी विराट कोहलीनेही श्रीलंकेच्‍या खेळाडूंशी चर्चा केली. 
- मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी प्रथम पंचांशी चर्चा केली. नंतर श्रीलंकेच्‍या खेळाडूंची त्‍यांनी समजूत काढली आणि 17 मिनिटांनंतर पुन्‍हा सामन्‍यास सुरुवात झाली. 

 

दुस-या वेळी गमागे मैदानाबाहेर गेले, वेळ: 1.00pm
- त्‍यानंतर काही क्षणांतच पुन्‍हा मॅच थांबवण्‍यात आली. 124वी ओव्‍हर टाकताना गमागेला पुन्‍हा श्‍वसनाचा त्रास झाला आणि त्‍याने गोलंदाजी थांबवली. त्‍यानंतर श्रीलंकेचे फीडियो मैदानावर आले. नंतर गमागे त्‍यांच्‍यासोबत मैदानाबाहेर गेले. 


वेळ: 1.15pm, 5 चेंडू टाकल्‍यावर लकमल मैदानाबाहेर 
- श्रीलंकन गोलंदाज सुरंगा लकमल 127वी ओव्‍हर टाकत होते. मात्र 5 चेंडू टाकून ते मैदानाबाहेर गेले. 
- त्‍यानंतर मैदानावरील दोन्‍ही पंचांनी चांडीमल आणि अँजेलो मॅथ्‍युशी चर्चा केली. श्रीलंकेचे मॅनेजर असांका गुरुसिंघे आणि भारताचे प्रशिक्षक रवि शास्‍त्रीही मैदानावर आले. चर्चेनंतर दिलरुवान ते ओव्‍हर पूर्ण केले. 


वेळ 1.27, मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी होते केवळ 10 खेळाडू 
- दिलरुवान परेराने ओव्‍हर पूर्ण केल्‍यानंतर संदाकन गोलंदाजी करण्‍यासाठी आले. यावेळी मैदानावर श्रीलंकेचे केवळ 10 खेळाडू होते. यानंतर चांडीमलने पुन्‍हा एकदा तक्रार करुन खेळ थांबवला. अशाप्रकारे वारंवार खेळात अडथळा येत असल्‍याने विराटने 536 धावांवर भारताचा डाव घोषित केला. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, एकाग्रता भंगल्याने कोहली बाद, त्रिशतक हुकले ...  

बातम्या आणखी आहेत...