आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोएबच्‍या ओव्‍हरमध्ये तुटली होती बॅट, पाकच्‍या तरूणीही होत्‍या याच्‍यावर फिदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्‍तानमध्‍ये चमकणा-या क्रिकेटरमध्‍ये सचिन सेहवागनंतर वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी याचे नाव घेतले जाते. एकदिवसीय मालिकेच्‍या पाचव्‍या सामन्‍यात लाहोरमध्‍ये बालाजी चर्चेत आला होता. त्‍याने वेगवान गोलंदाज शोएब अख्‍तरच्‍या ओव्‍हरमध्‍ये षटकार ठोकला होता. त्‍याच्‍या पुढच्‍या चेंडूत त्‍याची बॅट तुटली होती. तेव्‍हा मैदानातही बालाजी- बालाजीचे नारे घुमत होते. या सामन्‍यात त्‍याने तीन बळी घेऊन भारताला विजय मिळून दिला होता. चेन्‍नईमध्‍ये जन्‍मलेल्‍या या क्रिकेटरने रविवारी वाढदिवस साजरा केला.
बालाजीसाठी पाकिस्‍तानी मुली स्‍टेडियममध्‍ये 'Will you marry me' असा टॅग घेऊन आल्‍या होत्‍या. मात्र, बालाजी साऊथ इंडियन मॉडेल प्रिया थलूरच्‍या प्रेमात पडला. त्‍याने तिच्‍याशी लग्‍नही केले.
पाकमधील चाहत्‍यांचा हिरो
2003 - 04 च्‍या दरम्‍यान टीम इंडिया मालिका खेळण्‍यासाठी पाकिस्‍तानमध्‍ये गेली होती. सौरव गांगुली तेव्‍हा कर्णधार होता. भारत पाकिस्‍तानचा हा सामनाही वैशिष्‍ट्यपूर्ण ठरला होता. त्‍यावेळी चमकदार कामगिरी करणारा बालाजी केवळ भारतासाठीच हिरो नव्‍हता, तर पाकिस्‍तानी चाहत्‍यांनीही त्‍याला डोक्‍यावर घेतले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, बालाजी आणि प्रिया थलूर यांची फोटोज...