आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laxmipathy Balaji And Priya Thalur Wedding Reception In Photos

या बॉलरवर फिदा होत्या पाकिस्तानी तरुणी, साऊथ इंडियन ब्यूटीने केले क्लिन 'बोल्ड'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात आपल्या खेळाची चमक दाखवणाऱ्यांमध्ये सचिन आणि सेहवाग सारख्या दिग्गज खेळाडूंसोबत वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीचेही नाव प्रामुख्याने घेतले जाते. बालाजी मैदानात असताना पाकिस्तानी तरुणी 'Will you marry me' चे पोस्टर्स झळकावत होत्या, मात्र बालाजीने जीवनसाथी म्हणून साऊथ इंडियन मॉडेल प्रिया थलूरची निवड केली. 27 सप्टेंबर 1981 ला चेन्नईत जन्मलेल्या या क्रिकेटरला नायडू नावाने देखील ओळखले जाते.
इंडियन स्टारच्या चाहत्या होत्या पाकिस्तानी
2003-04 दरम्यान टीम इंडिया मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात गेली होती. सौरव गांगुली कर्णधार होता. भारत-पाकिस्तान सामना म्हटले की तो अंगावर काटा आणणाराच असतो. खेळाडू हिरो किंवा झिरो आहेत हे त्यांचा परफॉर्मन्स ठरवतो. आपल्या विरोधी संघाचा खेळाडू उत्तम खेळाचे प्रदर्शन करत असेल तर त्याला व्हिलन ठरवले जाते, मात्र या सामन्यात तसे झाले नव्हते. या मालिकेत सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या बालाजीने भारतीय आणि पाकिस्तानी अशा दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांची वाहवा मिळविली होती.
'बॅट तोड षटकार' आणि तरुणी झाल्या 'घायाळ'
एक दिवसीय मालिकेतील 5वा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये 24 मार्च रोजी खेळला गेला होता. बालाजीने या सामन्यात शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर एक शानदार षटकार लगावला होता. हा षटकार लगावत असताना त्याची बॅट तुटते मात्र बॉल वेगाने बाऊंड्री बाहेर जातो. त्यावेळी बालाजी त्याच्या परिचीत हास्यासह एकदा बॉलकडे आणि एकदा तुटलेल्या बॉलकडे पाहातो आणि स्टेडियमध्ये बालाजी-बालाजी असा जयघोष सुरु होतो. या सामन्यात त्याने तीन विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
परवेझ मुशर्रफ देखील मैदानात उपस्थित
पाकिस्तानच्या या पराभवाचे साक्षीदार पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ देखील होते. कर्णधार इंझमाम उल हकच्या नेतृत्वातील कदाचित हा सर्वात वाइट पराभव होता. आपल्या देशाच्या राष्ट्रपतीच्या उपस्थित पाकिस्तानला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मायदेशात विदेशी खेळाडूचा जयजयकरा होईल असा विचारही इंझीने कधी केला नसेल.
लग्नाला श्रीनिवासन, श्रीकांत, बद्रीनाथ यांची उपस्थिती
लक्ष्मीपती बालाजीने मॉडेल प्रिया थलूरसोबत सप्टेंबर 2013 मध्ये लग्न केले. या दोघांचे साधारण दोन वर्षे अफेअर सुरु होते. प्रियाने 2009 मध्ये मिस चेन्नई स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात ती सेकंड रनरअप राहिली होती. त्याच्या लग्नाला सहकारी खेळाडू सामन्यांच्या व्यस्ततेमुळे हजर राहू शकले नव्हते. मात्र चेन्नईचा मुरली विजय, सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि अनिरुद्ध श्रीकांत शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. या सोहळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिले ICC चे चेअरमन एन. श्रीनिवासन आणि श्रीलंकेचा क्रिकेटर मुथय्या मुरलीधरन.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बालाजी आणि प्रिया थलूर यांचे निवड फोटोज...