आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND v ENG: इंग्लंड दिवसअखेर 4 बाद 311 अशा सुस्थितीत, मोईन अली 99 धावांवर नाबाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रूटने राजकोटमध्ये पहिल्याच दिवशी मैदानात तळ ठोकला. या दरम्यान त्याने आपले 11 वे शतक ठोकले. रूटने 124 धावा केल्या. - Divya Marathi
इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रूटने राजकोटमध्ये पहिल्याच दिवशी मैदानात तळ ठोकला. या दरम्यान त्याने आपले 11 वे शतक ठोकले. रूटने 124 धावा केल्या.
राजकोट- भारत-इंग्लंड यांच्यातील 5 मॅचेसच्या सीरीजमधील पहिल्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने 4 बाद 311 धावा केल्या आहेत. मोईन अली (99) तर बेन स्टोक्स (19) धावांवर खेळत होते. जो रूटने सावरले इंग्लंडला...
- इंग्लंडचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज जो रूटने संघाला नुसते सावरलेच नाही तर त्याने संघाला सुस्थितीत नेले.
- 100 धावांत तीन गडी बाद झाल्यानंतर रूटने मोईन अलीला सोबत घेत दमदार खेळी केली.
- या जोडीने पहिल्या दिवशीचे दुसरे सत्र खेळून काढत इंग्लंडची आणखी पडझड होऊ दिली नाही.
- जो रूटने 154 चेंडूत 9 चौकारासह शतक ठोकले. त्याने 180 चेंडूत 124 धावा केल्या.
- या खेळीदरम्यान 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. रूटला उमेश यादवने झेलबाद केले.
- रूटला उत्तम साथ देताना मोईन अलीने आकर्षक नाबाद अर्षशतक ठोकले.
- त्याआधी रविंद्र जडेजाने कुकला 21 धावांवर तर हमीदला आर. अश्विनने (31) पायचित केले. बेन डकेटला अश्विनने रहाणेद्वारे झेलबाद केले.
राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर प्रथमच कसोटी खेळली जात आहे. यापूर्वी येथे फक्त दो वनडे आणि एक टी-20 मॅच झाली आहे. विराट कोहलीच्या टीमने मागील महिन्यात न्यूझीलंडला कसोटीत 3-0 असा क्लीन स्वीप दिला होता. टीममध्ये असे आहेत बदल...
- इंग्लंडने तीन फास्ट बॉलर आणि तीन स्पिनर्सना संघात स्थान दिले आहे.
- तर भारताने दोन फास्ट बॉलर आणि तीन स्पिनर्सना संघात स्थान दिले आहे.
- भारतीय स्पिनर्समध्ये अश्विन, जडेजा आणि अमित मिश्राचा समावेश आहे तर, सीमर्समध्ये मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
- पंड्या आणि नायर यांना प्लेईंग इलेवनमध्ये स्थान दिले गेले नाही.
असे आहेत दोन्ही संघ-
भारत: मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, वृद्धीमन साहा, रवींद्र जडेजा, मो. शमी, उमेश यादव, अमित मिश्रा.
इंग्लंड : अॅलिस्टर कुक, हसीब हमीद, जो रूट, बॅन डकेट, मोईन अली, बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टॉ, क्रिस वोक्स, जफर अंसारी, आदिल राशिद, स्टुअर्ट ब्रॉड.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कशी आहे राजकोटची खेळपट्टी आणि मॅचचे लाईव्ह फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...