आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE 2nd Test: India V South Africa At Bangalore, Nov 14 18, 2015

IND vs SA : आफ्रिकेची हाराकिरी, भारताची चांगली सुरुवात, दिवसअखेर बिनबाद 80

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिद्धिमान साहाने एबी डिव्हिलियर्सचा शानदार झेल घेतल्या. - Divya Marathi
रिद्धिमान साहाने एबी डिव्हिलियर्सचा शानदार झेल घेतल्या.
बेंगळुरू - भारतीय फिरकीपटुंनी पहिल्या दिवशी आफ्रिकेच्या फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 214 धावांत तंबूत परतला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या चिंता वाढवल्या आहेत. भारताने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावाची चांगली सुरुवात केली आहे.
सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांनी पहिल्याडावात दिवसअखेर 80 धावां केल्चाया आहेत. विजय 28 तर धवन 45 धावांवर नाबाद आहे. मालिकेतील दुसऱ्या टेस्टमध्ये आफ्रिकेने पहिल्नया डावात सर्वबाद 214 धावा केल्या. भारताच्या आर. अश्विनने 5 आणि रवींद्र जडेजाने 4 विकेट घेतल्या. आफ्रिकेकडून एबी डिव्हिलियर्सने सर्वाधिक 85 धावांची खेळी केली.
टॉस हारल्यानंतर पहिली बॅटिंग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या आफ्रिकेची सुरूवात तशी खरावच झाली. ओपनर्सनी सुरुवातीच्या सहा ओव्हरमध्ये केवळ चारच धावा केल्या. दरम्यान विराटने बॉलिंग आक्रमणात बदल करत आर. अश्विनकडे गोलंदाजीची जबाबदारी दिली. त्याने येताच वान झिलला LBW केले. झिलने 20 चेंडूत 2 चौकार मारत 20 धावा केल्या. यानंतर दोन बॉलनंतर लगेचच आश्विनने प्लेसिसला (0) पुजाराकरवी झेलबाद केले.
डिव्हिलियर्सचा कारकिर्दीतील 100 वा टेस्ट
भारतने आफ्रिके विरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेला. हा सामना एबी डिव्हिलियर्सचा कारकिर्दीतील 100 वा टेस्ट आहे. तब्बल तीन वर्षांनंतर या मैदानावर टेस्ट सामना खेळला जात आहे. या आधी या मैदानावर सप्टेंबर 2012 मध्ये भारत-न्यूझिलंड दरम्यान शेवटचा टेस्ट खेळाला गेला होता. टीम इंडियाने मोहाली टेस्ट जिंकल्यानंतर मालिकेत 1-0 अशी अघाडी मिळवली आहे.
डिविलियर्सची 85 धावांची खेळी
द.अफ्रिकेला एबी डिव्हिलियर्सच्या रुपात सातवां झटका बसला. त्याला जडेजाने 85 धावांवर असताना साहाच्या हाते झेलबाद केले. जडेजाने त्याच ओव्हरमध्ये रबाडालाही (0) पवेलियनचा रस्ता दाखवला.
साउथ अफ्रीका की पहली इनिंग का स्कोरबोर्ड
बॅट्समनरनबॉल46
वान झिलIBW बॉ. अश्विन102020
डीन एल्गरबॉ. जडेजा388121
फाफ डू प्लेसिसकॅ. पुजारा बॉ. अश्विन0300
हाशिम अमलाबॉ. आरोन71810
एबी डिव्हिलियर
कॅ. साहा बॉ. जडेजा
85105111
जेपी डुमिनीकॅ. रहाणे बॉ. अश्विन153920
विलासकॅ. एंड बॉ. जडेजा153210
कायली अॅबॉटरन आउट142020
रबाडाकॅ. पुजारा बॉ. जडेजा0200
मोर्कलकॅ. बिन्नी बॉ. अश्विन222030
इमरना ताहिरnot out0000
स्टुअर्ट बिन्नी आणि इशांत टीममध्ये
भारतीय प्लेइंग इलेवनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. स्टुअर्ट बिन्नीला अमित शर्मा आणि इशांत शर्माला उमेश यादवच्या स्थानावर घेण्यात आले आहे. पहिल्या सामन्यात उमेश यादवला एकही विकेट घेता आली नाही. खरेतर या खेळपट्टीचा विचार करता विराटने दोन स्पिनर्सला खेळवायचे ठरवले आहे. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या शिवाय इशांत शर्मा, वरूण आरोन आणि बिन्नी गोलंदाजीचे आक्रमण संभाळतील.
संघ असे...
भारतीय संघ: मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, इशांत शर्मा आणि वरूण आरोन.
दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर, वान झिल, फॉफ डु प्लेसिस, हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, जेपी डुमिनी, विलास, काइल अॅबॉट, कॅगिसो रबाडा, मोर्ने मोर्कल, इमरान ताहिर.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचा रोमांच...