आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3rd Day: भारताचा धावांचा डोंगर, ४३ महिन्यांनी भारत घरच्या मैदानावर ५०० च्या पुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक (२११) आणि अजिंक्य रहाणेच्या (१८८) दीड शतकाच्या बळावर भारताने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला. कोहली आणि रहाणे यांनी कसोटीत वैयक्तिक सर्वोच्च स्कोअर उभा केला. या दोघांच्या खेळीच्या बळावर भारताने पहिल्या डावात ५ बाद ५६५ धावा काढल्या. भारताने घरच्या मैदानावर ४३ महिन्यांच्या अंतराने ५०० प्लसचा स्कोअर उभा केला. याआधी मार्च २०१३ मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबाद कसोटीत ५०३ धावा काढल्या होत्या.
कोहली आणि रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी ३५६ धावांची भागीदारी केली. भारताकडून ही एकूण पाचवी सर्वात मोठी भागीदारी झाली, तर चौथ्या विकेटसाठी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी भागीदारी आहे. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ९ षटकांत बिनबाद २८ धावा काढल्या होत्या. त्या वेळी मार्टिन गुप्तिल १७ आणि टॉम लँथम सहा धावांवर खेळत होते. न्यूझीलंड संघाला पेनॉल्टीच्या ५ धावा मिळाल्या. भारताच्या डावादरम्यान रवींद्र जडेजा खेळपट्टीवर धावल्यामुळे पंचांनी न्यूझीलंडला ५ धावा दिल्या.

भारताने सकाळी ३ बाद २६७ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. भारताने सकाळच्या दोन सत्रांत एकही विकेट गमावली नाही. चहापानाच्या ब्रेकपर्यंत भारताचा स्कोअर ४५६ धावा असा झाला होता. तिसऱ्या सत्रात कोहली जितेन पटेलचा बळी ठरला. कोहलीने ३६६ चेंडूंचा सामना करताना २० चौकार मारले. रहाणेचे द्विशतक अवघ्या १२ धावांनी हुकले. त्याला ट्रेंट बोल्टने बाद केले. रहाणेने ३१८ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार आणि ४ षटकार मारले. रहाणे १८८ धावा काढून बाद झाले. यानंतर रोहित शर्माने (नाबाद ५१) न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. रोहितने ६३ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ३ चौकाराने ही खेळी केली.
कोहलीत लिडर म्हणून प्रगती : अजिंक्य रहाणे
विराट कोहलीने फलंदाज आणि एक कर्णधार, नेता म्हणून खूप प्रगती केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयी कामगिरी करण्यास सज्ज आहे, अशी स्तुती भारताचा मधल्या फळीचा फलंदाज अजिंक्य रहाणेने केली. कोहलीच्या द्विशतकी खेळीदरम्यान दुसऱ्या टोकाने त्याची फलंदाजी पाहण्याची मजा काही औरच आहे. तो नेत्रदीपक फलंदाजी करतो. डोळ्यांचे पारणे फेडतो. आम्ही खेळपट्टीवर टिकून खेळण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रयत्न यशस्वी झाले, असे तो म्हणाला.
भारताकडून कसोटीत २००
क्र. खेळाडू सामने २००
१. वीरेंद्र सेहवाग १०४ ०६
२. सचिन तेंडुलकर २०० ०६
३. राहुल द्रविड १६४ ०५
४. सुनील गावसकर १२५ ०४
५. विनोद कांबळे १७ ०२
६. दिलीप सरदेसाई ३० ०२
७. वसीम जाफर ३१ ०२
८. चेतेश्वर पुजारा ३८ ०२
९. विनू मंकड ४४ ०२
१०. विराट कोहली ४८ ०२
११. लक्ष्मण १३४ ०२
धावफलक
भारत पहिला डाव धावा चेंडू ४ ६
विजय झे. लँथम गो. पटेल १० १८ ०२ ०
गंभीर पायचीत गो. बोल्ट २९ ५३ ०३ २
पुजारा त्रि. गो. सँटनर ४१ १०८ ०६ ०
कोहली पायचीत गो. पटेल २११ ३६६ २० ०
रहाणे झे. वॉटलिंग गो. बोल्ट १८८ ३८१ १८ ४
रोहित शर्मा नाबाद ५१ ६३ ०३ २
रवींद्र जडेजा नाबाद १७ २७ ०१ ०
अवांतर : १०. एकूण : १६९ षटकांत ५ बाद ५५७ धावा. (डाव घोषित). गडी बाद होण्याचा क्रम : १-२६, २-६०, ३-१००, ४-४६५, ५-५०४. गोलंदाजी : टीम बोल्ट ३२-२-११३-२, मॅट हेनरी ३५-३-१२७-०, जितेन पटेल ४०-५-१२०-२, सँटनर ४४-४-१३७-१, निशाम १८-१-५३-०.
न्यूझीलंड पहिला डाव धावा चेंडू ४ ६
मार्टिन गुप्तिल नाबाद १७ ४० ०३ १
टॉम लंँथम नाबाद ०६ २४ ०० ०
अवांतर : ५. एकूण : ९ षटकांत बिनबाद २८ धावा. गोलंदाजी : मोहंमद शमी २-०-५-०, उमेश यादव २-०-७-०, रविचंद्रन अश्विन ३-१-९-०, रवींद्र जडेजा २-१-२-०.
बातम्या आणखी आहेत...