आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अश्विनचा विक्रम! कारकीर्दीत २० व्या वेळी डावात ५ विकेट घेणारा गोलंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - ऑफस्पिनररविचंद्रन अश्विनने दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडच्या १० पैकी फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अश्विनने ८१ धावांत िवकेट घेतल्या, तर दोघांना धाबवाद केले. अश्विनमुळे तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड संघ २९९ धावांत गारद झाला. अश्विनशिवाय गडी रवींद्र जडेजाने बाद केले.

भारताला पहिल्या डावात २५८ धावांची आघाडी मिळाली. कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात भारताने बिनबाद १८ धावा काढल्या. भारताचा सलामीवीर गौतम गंभीर तिसऱ्या षटकात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ड्राइव्ह मारून जखमी झाला. गंभीरचा खांदा दुखावला. गंभीर निवृत्त होऊन मैदानाबाहेर गेला. तोपर्यंत गंभीरने धावा काढल्या होत्या. यानंतर चौथ्या षटकात मुरली विजयला डेंजर झोनमध्ये धावल्यामुळे पंचांनी ताकीद दिली. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी मुरली विजय ११ आणि चेतेश्वर पुजारा धावा काढून नाबाद होते. भारताकडे आता एकूण २७६ धावांची आघाडी झाली आहे.
चारषटकांत चार विकेट
त्याआधीसकाळी न्यूझीलंडने पहिल्या सत्रात केवळ एक विकेट टॉम लँथमच्या (५३) रूपाने गमावली. त्याने दुसरा सलामीवीर गुप्तिलसोबत ११८ धावांची शतकी सलामी दिली. अश्विनने लँथमला झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या सत्रात अश्विनने आपल्या सलग चार षटकांत गडी बाद करून न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. दुसऱ्या सत्रात भारताला विकेटसाठी फार वाट बघावी लागली नाही. अश्विनने केन विल्यम्सनला (८) त्रिफळाचीत केले. चार धावांनंतर रॉस टेलर शून्यावर अश्विनच्या गोलंदाजीवर रहाणेकरवी झेलबाद झाला. दुसऱ्या टोकावर नाबाद गुप्तिलला अश्विनने धावबाद केले. यानंतर ल्यूक रोंचीसुद्धा भोपळा फोडताच अश्विनचा बळी ठरला. जेम्स निशाम (७१) आणि बी. जे. वाॅटलिंग (२३) यांनी सहाव्या विकेटसाठी ५२ धावा जोडल्या. जडेजाने वॉटलिंगला बाद करून ही भागीदारी मोडली. सँटनरने २२, तर जितेन पटेलने १८ धावांचे योगदान दिले. तळाच्या फलंदाजांमुळे न्यूझीलंडने २९९ धावा काढल्या. अन्यथा किंवीचा डाव लवकर आटोपला असता.
बातम्या आणखी आहेत...