आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND Vs NZ : रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर टीम इंडियाचा 557 धावांवर डाव घोषित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - न्यूझिलंडविरुध्द तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 5 बाद 557 धावांवर पहिला डाव घोषित केला. रोहित शर्माने अर्धशतक ठोकताच विराटने डाव घोषित केला. कसोटीचा दुसरा दिवस विराट कोहली आणि अजिंक्य राहाणेच्या बॅटिंगने गाजला. करिअरचे दुसरे द्विशतक केल्यानंतर 211 धावांवर विराट आऊट झाला. तर राहाणेने 188 धावा काढल्या. या कामगिरीसोबतच विराट दूहेरी द्विशतक करणारा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला आहे. मात्र राहणेचे द्विशतक अवघ्या 12 घावांनी हुकले.
कोहलीने काल शतकपूर्ण केले होते. तर राहाणेने 79 धावा केल्या होत्या. दोघांनीही आजच्या खेळाची चांगली सुरुवात केली. राहाणेने कारकिर्दीतील 8 वे शतक पूर्ण केले. कोहलीनेही धावा जमवायला सुरुवात केली होती. दोघांनी खेळपट्टीवर जम बसवला आणि जणू नांगर टाकल्याप्रमाणे दोघे खेळपट्टीवर टिकून राहिले. कोहलीने द्विशतक पूर्ण केले. 211 धावा करत तो पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर राहाणे द्विशतक अवघ्या 12 धावांनी हुकले. बोल्टच्या गोलंदाजीवर 188 धावा काढून तो बाद झाला. चौथ्या विकेटसाठी दोघांनी 365 धावांची भागीदारी केली.
इंदूरचे होळकर स्टेडियम भारताचे २२ वे कसोटी मैदान ठरले. जवळपास २२ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत शनिवारी येथे मालिकेतील तिसऱ्या कसोटीला सुरुवात झाली. या मालिकेत पहिला शतकधारी बनण्याचा मान विराट कोहलीने मिळवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत भारताने ३ बाद २६७ धावा काढल्या होत्या. या वेळी कोहली नाबाद १०३, तर रहाणे नाबाद ७९ धावांवर होता. या शतकाआधी कोहलीने मागच्या सात डावांत ४४, ३, ४, ९, १८, ९ आणि ४५ अशा धावा काढल्या.
भारतीय संघ एक वेळ ३ बाद १०० धावा अशा अडचणीत सापडला होता. मुरली विजय १०, दोन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणारा गौतम गंभीर २९ आणि चेतेश्वर पुजारा ४१ धावा काढून बाद झाले होते. यानंतर कोहलीने रहाणेसोबत भारताचा डाव सावरला. कोहलीने आपल्या खेळीत १९१ चेंडूंचा सामना करताना १० चौकार मारले, तर रहाणेने १७२ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार आणि १ षटकार मारला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट, जितेन पटेल, मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. ४०० पेक्षा अधिक धावा काढण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यामुळे दुसऱ्या दिवशीसुद्धा टिकून खेळण्यावर आमचा जोर असेल, असे पुजारा म्हणाला.

हेही आहे महत्त्वाचे
- ०६ वर्षांनी कसोटीत भारताच्या भूमीवर भारताच्या फलंदाजाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकले. कोहलीच्या या शतकाआधी सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकले होते.
- ४३ महिन्यांनी कोहलीने भारतात एखाद्या कसोटीत शतक ठोकले. त्याने याआधी २२ फेब्रुवारी २०१३ रोजी चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले होते. यादरम्यान १७ डावांत तो एकही शतक काढू शकला नाही. कर्णधार म्हणून भारतात हे त्याचे पहिले शतक आहे.
- ०६ शतके कोहलीची कर्णधार म्हणून झाली आहेत. याबाबत त्याने नवाब पतौडी, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी ( प्रत्येकी ५ शतके) यांना मागे टाकले. सुनील गावसकर (११), अझरुद्दीन (९) आणि तेंडुलकर (७) त्याच्या पुढे आहेत.
- १३ वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने न्यूझीलंडविरुद्ध शतक काढले. कोहलीच्या आधी २००३ मध्ये गांगुलीने अहमदाबाद कसोटीत शतक ठोकले होते.

नेता क्रीडा संघटनेलाही सांभाळू शकतो : ठाकूर
लोढा समितीने बीसीसीआयमधून राजकीय नेत्यांना बाहेर करण्याच्या शिफारशीबाबत विचारले असता बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले, “देशाला एखादा नेता चालवू शकतो, तर मग क्रीडा संस्थेला का नाही? खेळ भावनेला देशप्रेमाशी जोडून बघितले पाहिजे. चांगला खेळाडू, चांगला प्रशासक होईल हे जरुरी नाही. प्रशासक चांगला व्यक्ती असला पाहिजे.'
पुढे स्लाईडद्वारे पाहा, इंदूर कसोटीतील पहिल्या दिवसाची क्षणचित्रे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...