आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs ENG: इंग्लंडच्या 400 धावांनंतर भारत 1 बाद 146; विजयचे नाबाद अर्धशतक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरली विजयने मुंबई कसोटीत शानदार अर्धशतक ठोकले. - Divya Marathi
मुरली विजयने मुंबई कसोटीत शानदार अर्धशतक ठोकले.
मुंबई- मुंबई कसोटीत दुस-या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 130 षटकात 400 धावात संपुष्टात आला. त्याला प्रत्त्युत्तर देताना भारताने दुस-या दिवसअखेर 52 षटकात 1 बाद 146 धावा केल्या होत्या. मुरली विजय (70) आणि चेतेश्वर पुजारा (47) खेळत होते. सलामीवीर केएल राहुल 24 धावांवर मोईन अलीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. बलटरमुळे इंग्लंडच्या 400 धावा...
- 8 बाद 334 नंतरही जोस बटलरने जॅक बालच्या (31) मदतीने इंग्लंडला 400 धावांचा टप्पा गाठून दिला.
- बटलर 76 धावांवर सर्वात शेवटी बाद झाला. त्याआधी सलामीवीर किटन जेनिंग्स (112), मोईन अली (50), अॅलिस्टर कूक यांच्या योगदानामुळे इंग्लंडने पहिल्या दिवशी वर्चस्व राखले.
- भारताचे अव्वल फिरकीपट्टू आर. अश्विनने 112 धावांत 6 तर रविंद्र जडेजाने 109 चेंडूत 4 बळी टिपले.
असे बाद झाले इंग्लंडचे फलंदाज-
- रविंद्र जडेजाने जोस बटलरला 76 धावांवर त्रिफळाचित करत इंग्लंडचा डाव संपवला.
- जॅक बालला अश्विनने विकेटकीपर पार्थिव पटेलकडे 31 धावांवर झेलबाद केले.
- त्याआधी रविंद्र जडेजाने ख्रिस वोक्सला 11 धावांवर तर अब्दुल राशीदला 4 धावांवर बाद केले. - - आज सकाळी आर. अश्विनने बेन स्टोक्सला 31 धावांवर कोहलीद्वारे झेलबाद केले.
- पहिल्या डावात अश्विनने 6 तर जडेजाने 4 बळी टिपले.
भारताच्या फलंदाजीकडे आता लक्ष-
- सामन्याच्या दुस-या दिवशी इंग्लंडचे लक्ष्य 400 धावांचे होते. त्यात इंग्लंड यशस्वी झाले आहेत. त्यामुळे पाहुण्या टीमने यजमान भारतीय संघावर काहीसे वर्चस्व मिळवले.
- आता भारताचे फलंदाज कशी फलंदाजी करतात व पहिल्या डावात किती धावा जमवतात यावर कसोटीचे भवितव्य ठरेल.
- त्यामुळे दुस-या दिवस भारतीय फलंदाजांसाठी खूपच महत्त्वाचा असेल.
- खेळपट्टीकडून चेंडूला अधिक ‘टर्न’ मिळत आहे, ही बाब भारताविरोधात जाणारी आहे.

किटन जेनिंग्ज चमकला-
- डावखुरा फलंदाज जेनिंग्जने 219 चेंडूंचा सामना करताना 112 धावा काढल्या. या खेळीत त्याने 13 चौकार मारले.
- त्याने कर्णधार अॅलेस्टर कुकसोबत (46) पहिल्या विकेटसाठी 99 धावांची सलामी दिली.
- यानंतर जो. रुटसोबत (21) दुसऱ्या विकेटसाठी 37 धावा जोडल्या. नंतर मोईन अलीसोबत (50) तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली.
- जेनिंग्जने शानदार कामगिरी करताना पदार्पणात शतक ठोकले. जेनिंग्सने मैदानाच्या चारही बाजूने फटकेबाजी केली.
- त्याने जबाबदारीने फलंदाजी केल्याने इंग्लंडला अडीचशेचा टप्पा ओलांडता आला. जेनिंग्ज-मोईन अलीच्या भागीदारीने डाव सावरला.
तेव्हा ‘प्राण कंठाशी’...
- कसोटी पदार्पणाचा दिवस तणावपूर्व होता. पहाटे जागे झालो तेव्हापासूनच दडपण होते.
- प्रत्यक्ष डावाला सुरुवात केली आणि धावांचे खाते उघडण्याआधीच झेल उडाला.
- त्या वेळी ‘प्राण कंठाशी’ आले होते. झेल सुटला आणि सुटकेचा श्वास सोडला, असे शतकवीर किटन जेनिंग्ज याने सांगितले.
भुवनेश्वरच्या थ्रोवर मैदानी पंच राफेल जखमी-
- 49 व्या षटकात इंग्लिश फलंदाज किटन जेनिंग्जने अश्विनच्या गोलंदाजीवर स्क्वेअरलेगवर उभे असलेले पंच राफेल यांच्या बाजूने चेंडूला मारले.
- भुवनेश्वरने चेंडू रोखल्यानंतर पुजाराच्या दिशेने चेंडू फेकला. चेंडू पंचांच्या मागच्या बाजूला लागला. यानंतर राफेल मैदानात कोसळले.
- राफेल मैदानात कोसळताच दुसरे पंच ब्रुस ओक्सेनफोर्ड त्यांच्याजवळ गेले आणि आपल्या कॅपने राफेलला सावली दिली.
- राफेल यांना नंतर रुग्णालयात नेण्यात आले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबई कसोटीतील महत्त्वाची क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...