आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 10: कोलकाता ठरले ‘बाहुबली\'; उथप्पा-गंभीरच्या 158 धावांच्या भागीदारीने विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टीव्ह स्मिथने नाबाद ५१ धावा केल्या. - Divya Marathi
स्टीव्ह स्मिथने नाबाद ५१ धावा केल्या.
बंगळुरू- कर्णधार गौतम गंभीर (६२) आणि रॉबिन उथप्पाच्या (८७) तुफानी फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये बुधवारी रायझिंग पुणे सुपरजायंट्सला ७ विकेटने हरवले. पुण्याने १८२ धावा काढल्या होत्या. केकेआरने १८.१ षटकांत ३ बाद १८४ धावा काढून विजय मिळवला. या विजयानंतर कोलकाता खरे ‘बाहुबली' ठरले. कोलकाताच्या नावे आता सर्वाधिक १२ गुण असून गुणतालिकेत नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान आहे. 

केकेआरकडून सुनील नरेन १६ धावा काढून बाद झाला. यानंतर गंभीर आणि राॅबिन उथप्पाने दुसऱ्या विकेटसाठी १५८ धावांची दीडशतकी भागीदारी करून विजय एकतर्फी केला. विजयाजवळ पोहोचून दोघे बाद झाले. गंभीरने ४६ चेंडूंत १ षटकार, ६ चौकारांसह ६२ धावा ठोकल्या, तर उथप्पाने ४७ चेंडूंत ६ षटकार आणि ७ चौकारांसह ८७ धावांचा पाऊस पाडला. 

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पुणे सुपरजायंट्सने अजिंक्य रहाणे (४६), राहुल त्रिपाठी (३८) आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या (५१*) खेळीच्या बळावर ५ बाद १८२ धावा काढल्या. रहाणे आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी ७.५ षटकांत ६५ धावांची भागीदारी केली. दरम्यान, मधल्या फळीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अवघ्या ११ चेंडूंत २ षटकार, १ चौकारासह २३ धावांची खेळी केली. डॅनियल क्रिस्टियनने ६ चेंडूंत १६ धावा काढून धावगती वाढवली.
 
उथप्पाचे अर्धशतक 
कोलकात्याकडून तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रॉबिन उथप्पाची बॅट तळपली. त्याने अवघ्या ४७ चेंडूंचा सामना करताना ६ षटकार आणि ७ चौकारांच्या साहाय्याने ८७ धावांचा पाऊस पाडला. उथप्पाने फक्त आक्रमक खेळी केली नाही तर कर्णधार गौतम गंभीरसोबत १५८ धावांची भागीदारी करून विजय निश्चित केला.
 
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट्स         धावा     चेंडू     ४    ६
रहाणे यष्टी. उथप्पा गो. नरेन      ४६    ४१    ०४    १
राहुल त्रिपाठी त्रि. गो. चावला        ३८    २३    ०७    ०
स्टीव्हन स्मिथ नाबाद                 ५१    ३७    ०४    १
धाेनी यष्टी. उथप्पा गो. कुलदीप    २३    ११    ०१    २
तिवारी यष्टी. उथप्पा गो. कुलदीप   ०१    ०२    ००    ०
डॅनियल क्रिस्टियन झे.पांडे गो. उमेश  १६    ०६    ००    २
अवांतर : ७. एकूण : २० षटकांत  ५ बाद १८२ धावा. गडी बाद क्रम : १-६५, २-११२, ३-१४८, ४-१५०, ५-१८२. गोलंदाजी : उमेश यादव ३-०-२८-१, वोक्स ३-०-३८-०, सुनील नरेन ४-०-३४-१, ग्रँडहोम २-०-१४-०, पीयूष चावला ४-०-३६-१, कुलदीप यादव ४-०-३१-२.
 
कोलकाता नाइट रायडर्स      धावा     चेंडू     ४    ६
सुनील नरेन धावबाद     १६    ११    ०३    ० 
गंभीर झे. ठाकूर गो. क्रिस्टियन    ६२    ४६    ०६    १
उथप्पा झे. त्रिपाठी गो. उनादकट    ८७    ४७    ०७    ६
डॅरेन ब्राव्हो नाबाद    ०६    ०५    ०१    ०
मनीष पांडे नाबाद    ००    ००    ००    ०
अवांतर : १३. एकूण : १८.१ षटकांत ३ बाद १८४ धावा. गडी बाद क्रम : १-२०, २-१७८, ३-१७९. गोलंदाजी : जयदेव उनादकट ३-०-२६-१, शार्दुल ठाकूर ३.१-०-३१-०, वाॅशिंग्टन सुंदर ३-०-३२-०, डॅनियल क्रिस्टियन ४-०-३१-१, इम्रान ताहिर ४-०-४८-०, राहुल त्रिपाठी १-०-१२-०. सामनावीर : रॉबिन उथप्पा
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे....
बातम्या आणखी आहेत...