आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Test सामन्यात T-20 ची मज्जा: विराट कोहलीची डबल सेंच्युरी, केली ब्रायन लाराची बरोबरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - श्रीलंका विरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी भारताने 4 विकेट्स गमवून 572 धावा ठोकल्या आहेत. यात कॅप्टन विराट कोहलीने डबल सेंच्युरी लावली आहे. टेस्ट करिअरचे हे त्याचे 20 वे शतक आहे. एकूणच 5 डबल सेंच्युरी लावणाऱ्या विराटने आता महान बॅट्समन ब्रायन लाराची बरोबरी केली आहे. यासोबतच रोहित शर्मा लवकरच आपले शतक पूर्ण करणार आहे. तत्पूर्वी मॅचच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने 2 विकेट्सवर 312 धावा ठोकल्या होत्या. मॅचच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेचा संघ 205 धावांवर ऑल आऊट झाला होता. 

 

> टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या करिअरचे पाचवे दुहेरी शतक लावले आहे. त्याने 200 धावा 259 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी आपले शतक त्याने 130 बॉलमध्ये पूर्ण केले. 
> विराटने 139.2 ओव्हमध्ये दिलरुवान दिलरुवान परेराच्या चेंडूवर लॉन्ग ऑनच्या वरतून सिक्स लावून 150 धावा पूर्ण केल्या. त्याने आपली सर्व 5 द्विशतके कॅप्टन असताना केली आहेत. 
> 5 द्विशतके लावून कॅप्टन विराटने माजी क्रिकेटर ब्रायन लाराची बरोबरी केली आहे. लाराने देखील कॅप्टन असताना 47 सामने खेळून 5 दुहेरी शतक लावले होते. 
> एवढेच नव्हे, तर तिन्ही फॉरमॅट्समध्ये विराटने या 2017 मध्ये सर्वाधिक 10 सेंच्युरी लावल्या आहेत. एक कॅप्टन म्हणून कुठल्याही क्रिकेटरने वर्षभरात ठोकलेल्या ह्या सर्वाधिक सेंच्युरी आहेत. याबाबतीत विराटनंतर स्टीव्ह स्मिथचा नंबर लागतो. त्याने 2017 मध्ये 5 शतक ठोकले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...