आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs ZIM: डेब्यू मॅॅचमध्‍ये राहुलचे शतक, भारताचा 9 विकेटने विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे- युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (२८ धावांत ४ विकेट) घातक गोलंदाजी आणि आपला पहिला वनडे खेळत असलेला 'प्लेअर ऑफ द मॅच' सलामीवीर लोकेश राहुलच्या नाबाद १०० धावांच्या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या वनडेत झिम्बाब्वेला ९ विकेटने सहजपणे हरवले. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा वनडे साेमवारी होईल.

कर्णधार धोनीने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा िनर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवला. भारताने झिम्बाब्वेला ४९.५ षटकांत १६८ धावांत गुंडाळले. यानंतर धावांचा पाठलाग करताना संथ सुरुवात केली. पदार्पणाचा सामना खेळत असलेला करुण नायरची (११) लवकर गमावली. यानंतर लोकेश राहुल (नाबाद १००) आणि अंबाती रायडू (नाबाद ६२) यांनी विकेट न गमावता भारताला विजय मिळवून दिला. भारताने ४२.३ षटकांत १ बाद १७३ धावा काढून विजय मिळवला.
राहुलचा विजयी षटकार
भारताच्या विजयासाठी २ आणि खेळपट्टीवर नाबाद असलेल्या राहुलला शतकासाठी ६ धावांची गरज होती. स्ट्राइकवर राहुलच होता. त्याने मसकदजाला शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले आणि भारताला विजयही मिळवून दिला. या शतकासह राहुलने पहिल्या वनडेत खेळताना सर्वाधिक खेळीसह शतक ठोकण्याचा विक्रम केला. राहुलने ११५ चेंडूंचा सामना करताना नाबाद १०० धावा काढल्या. त्याने षटकार मारताच भारताने विजयी शंखनाद केला. पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला. अंबाती रायडूने १२० चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ६२ धावा काढल्या.

बुमराहच्या ४ विकेट
प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेकडून मुतुंबामीने सर्वााधिक ४१ धावा काढल्या. त्याच्याशिवाय सिबांदाने २१, तर चिगुम्बुराने २३ धावांचे योगदान दिले. भारताकडून बुमराहने ९.५ षटकांत २ ओव्हर निर्धाव टाकताना २८ धावांत ४ विकेट घेतल्या.
धोनीसाठी महत्वाची मालिका..
ही मालिका भारतीय संघापैक्षाही महेंद्रसिंग धोनीसाठी अधिक महत्वाची आहे, धोनीच्या सध्याच्या कामगिरीवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे कारणच काय? IPL-9 मध्ये त्याच्या नेतृत्वात रायझिंग पुणे सुपरजाइंट्स संघदेखाल फार काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता. यामुळेही या मालिकेत धोनीवर सर्वांचेच लक्ष राहणार आहे. एवढेच नाही तर तो कारकिर्दितील 9000 धावांपैक्षा केवळ 82 धावाच दूर आहे.
याविक्रमाच्या उंबरठ्यावर आहे धोनी
- धोनीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 8918 धावा केल्या आहेत. तो 9000 धावांपासून केवळ 82 धावांनी दूर आहे.
- जर त्याने 9 हजार धावा पूर्ण केल्यातर एकदिवसिय सामन्यांत अशी कामगिरी करणारा तो 5वा भारतीय ठरेल.
- यापू्र्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अझहरुद्दीन आणि राहुल द्रविडने ही कामगिरी केली आहे.
- तर दुसरीकडे, धोनी अशी कामगिरी करणारा धोनी जगातील तिसरा आणि भारताचा पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज ठरेल.
- धोनीपूर्वी श्रीलंकेच्या कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलक्रिस्टने अशी कामगिरी केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचे Photos... वाचा शेड्यूल आणि धावफलक ..
बातम्या आणखी आहेत...