पर्थ- पाच सामन्याच्या मालिकेतील पहिल्या एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. रोहित शर्माच्या (171*) शानदार शतकाच्या जोरावर भारताने 309 धावा केल्या होत्या. उत्तरात ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्टीवन स्मिथच्या (149) आणि जॉर्ज बेलीच्या (112) शानदार शतकी खेळीच्या जोरावर 4 चेंडू शिल्लक ठेऊन 310 धावा करत विजय मिळवला. भारताकडून डेब्यू स्टार सरनने 3 तर आर. अश्विनने दोन बळी मिळवले.
- राेहितचे शानदार शतक, विराटचे अर्ध शतक, भारत 309
रोहित शर्माचे नाबाद दीडशतक (171) व
विराट कोहलीच्या शानदार 91 धावांच्या जोरावर
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 310 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीकरण्याचा निर्णय घेतला. मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 309 धावा केल्या.
- विराट कोहली दुसऱ्या गड्याच्या रुपात बाद झाला. तो 91 धावांवर असताना फॉल्कनरने त्याला फिंचच्या हाते झेलबाद केले.
- रोहित शर्माने कारकिर्दितील 9 वे शतक 122 चेंडूंत पूर्ण केले. त्याने 171* धावा केल्या.
- सलामीवीर शिखर धवन अवघ्या 9 धावांवर खेळत असताना हेजलवुडच्या चेंडूवर मिचेल मार्शने त्याला अलगद टिपले.
भारताचे धाव फलक...
बॅट्समन |
रन |
बॉल |
4 |
6 |
रोहित शर्मा |
नॉट आउट |
171 |
163 |
13 |
7 |
शिखर धवन |
कॅ. मार्श बॉ. हेजलवुड |
9 |
22 |
1 |
0 |
विराट कोहली |
कॅ. फिंच बॉ. फल्कनर |
91 |
97 |
9 |
1 |
एमएस धोनी |
कॅ. बॉलैंड बॉ. फल्कनर |
18 |
13 |
1 |
1 |
रवींद्र जडेजा |
नॉट आउट |
10 |
5 |
1 |
0 |
टीम इंडिया ने जिंकली नाणेफेक...
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सामना सुरु होण्यापूर्वी येथे पाऊस झाला. भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आतापर्यंत 8 वनडेत 6 विजय मिळवले आहेत. टीम इंडियाने दोन सराव सामने जिंकून दौर्यांचा शानदार श्रीगणेशा केला आहे.
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौर्याचे शड्यूल...
पाच सामन्यांची वनडे मालिका...
- पहिला वनडे : 12 जानेवारी, पर्थ
- दुसरा वनडे : 15 जानेवारी, ब्रिस्बेन
- तिसरा वनडे : 17 जानेवारी, मेलबर्न
- चौथा वनडे : 20 जानेवारी, कॅनबरा
- पाचवा वनडे : 23 जानेवारी, सिडनी
तीन सामन्यांची टी20 मालिका
- पहिला सामना : 26 जानेवारी, एडिलेड
- दुसरा सामना : 29 जानेवारी, मेलबर्न
- तिसरा सामना : 31 जानेवारी, सिडनी
दोन्ही संघ असे
भारत : महेंद्रसिंगधोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, उमेश यादव, गुरकिरत सिंग, ऋषी धवन, बरिंदर सरां.
ऑस्ट्रेलिया: स्टिवनस्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, जॉर्ज बेली, शॉन मार्श, मॅथ्यू वेड, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, जेम्स फॉकनर, जोश हेझलवूड, स्कॉट बोलेंड, जोएल पॅरिस, केन रिचर्डसन.
पुढील स्लाइडवर वाचe