आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Tour Of Bangladesh, 1st ODI: Bangladesh V India At Dhaka

बांगलाचे शेर चमकले; टीम इंडियावर यजमान बांगलादेशची ७९ धावांनी मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर- पाऊस अाणि यजमान बांगलादेशच्या गाेलंदाजांकडून कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या टीम इंडियाने गुरुवारी एकदिवसीय सामन्यात सपाटून मार खाल्ला. बांगलादेशने मालिकेतील सलामी सामन्यात भारतावर ७९ धावांनी मात केली. यासह यजमान टीमने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा वनडे २१ जूनला रविवारी हाेणार अाहे.

रहमान (५/५०), तस्कीन अहमद (२/२१) अाणि सकिब-अल-हसन (२/३३) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान संघाने ४६ षटकांमध्ये सामना जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारतासमाेर विजयासाठी खडतर ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरामध्ये टीम इंडियाने अवघ्या २२८ धावांत गाशा गुंडाळून लाजिरवाणा पराभव पत्करला.

धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाच्या राेहित शर्माने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही. विराट काेहली (१), रहाणे (९), धाेनी (५) सपशेल अपयशी ठरले.

तत्पूर्वी, यजमान बांगलादेशने सलामीवीर तमीम इक्बाल (६०), सौम्य सरकार (५४) व सकिब-अल-हसनच्या (५२) अर्धशतकाच्या बळावर ३०७ धावांचा डोंगर उभा केला. पावसाचा व्यत्यय आला, तरीही पंचांनी षटके कमी केली नाहीत.

यजमान संघाने जबरदस्त सुरुवात केली. त्यांच्या सलामीवीरांनी अवघ्या १३.४ षटकांत ७ च्या रनरेटने धावांचा पाऊस पाडताना १०२ धावांची सलामी दिली.

धो-धो धुतले
बांगलादेशच्या फलंदाजांनी सर्व भारतीय गोलंदाजांना धो-धो धुतले. मोहित शर्मा महागडा ठरला. त्याने ४.४ षटकांत तब्बल ५३ धावा मोजल्या. भुवनेश्वर, उमेश यादव यांनी प्रत्येकी २, तर अश्विनने ५१ धावांत ३ गडी बाद केले. भुवन, उमेश, अश्विनही महागडे ठरले.

काेहलीचे यष्टिरक्षण
विराट काेहलीने अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा यष्टिरक्षकाची भूमिका बजावली. या वेळी यष्टिरक्षण करताना त्याने पॅडही घातलेले नसल्याचे दिसून अाले.

रहमानचे पाच बळी
रहमानने एकट्याने धारदार गाेलंदाजी करून भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याने घरच्या मैदानावर ९.२ षटकांत ५० धावा देत ५ बळी घेतले. तस्किन अहमद व सकिबने प्रत्येकी दाेन बळी घेतले.

धावफलक
बांगलादेश धावा चेंडू ४ ६

तमीम झे. रोहित गो. अश्विन ६० ६२ ७ १
सौम्य सरकार धावबाद ५४ ४० ८ १
लिंटन दास पायचित गो. अश्विन ०८ १३ ० ०
मुशाफिकूर झे. रोहित गो. अश्विन १४ १९ १ ०
सकिब झे. जडेजा गो. उमेश ५२ ६८ ३ ०
शब्बीर रहेमान त्रि. गो. जडेजा ४१ ४४ ५ १
नासेर हुसेन झे. जडेजा गो. उमेश ३४ २७ ३ १
मुर्तुजा झे. रोहित गो. मोहित २१ १८ ३ ०
रुबेल झे. मोहित गो. भुवनेश्वर ०४ ०५ १ ०
तस्किन झे. कोहली गो. भुवनेश्वर ०२ ०५ ० ०
मुशाफिकूर रहेमान नाबाद ०० ०० ० ०

अवांतर : १७. एकूण : ४९.४ षटकांत सर्वबाद ३०७ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१०२, २-१२३, ३-१२९, ४-१४६, ५-२२९, ६-२६७, ७-२८२, ८-२८६, ९-२९८, १०-३०७. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७-०-३७-२, उमेश यादव ८-०-५८-२, रविचंद्रन अश्विन १०-०-५१-३, मोहित शर्मा ४.४-०-५३-१, सुरेश रैना १०-०-४०-०, रवींद्र जडेजा ८-०-४८-१, विराट कोहली २-०-१२-०

भारत धावा चेंडू ४ ६
रोहित झे. मुर्तुझा गो. रहमान ६३ ६८ ४ १
धवन झे. मुशफिकूर गो. तस्किन ३० ३८ ३ ०
कोहली झे. मुशफिकूर गो. तस्किन ०१ ०४ ० ०
रहाणे झे. नासीर गो.रहमान ०९ २५ १ ०
सुरेश रैना त्रि.गो. रहमान ४० ४० १ २
धोनी झे. मुशफिकूर गो. सकिब ०५ ०७ ० ०
जडेजा झे. सौम्या गो. रहमान ३२ ४२ २ ०
आश्विन झे. मुशफिकूर गो. रहमान ०० ०१ ० ०
भुवनेश्वर कुमार नाबाद २५ २१ २ १
मोहित झे. मुशफिकुर गाे. मुर्तुझा ११ १९ २ ०
उमेश यादव पायचीत गाे. सकिब २ ११ ० ०

अवांतर : . एकूण : गडी बाद होण्याचा क्रम : १-९५, २-१०१, ३-१०५, ४-११५, ५-१२८, ६-१८८, ७-१८८, ८-१९५, ९-२१९, १०-२२८. गोलंदाजी : मुशाफिकूर रहमान ९.२-१-५०-५, तस्किन अहमद ६-१-२१-२, मुर्तुझा १०-०-५३-१, रुबेल हुसेन ६-०-३६-०, नासीर हुसेन ६.४-०-३१-०, सकिब ८-०-३३-२. सामनावीर : रहमान