आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • LIVE India Tour Of Bangladesh, 3rd ODI: Bangladesh V India At Dhaka, Jun 24, 2015

टीम इंडियाचा शेवट गाेड, बांगलादेशवर ७७ धावांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - सलगच्या दाेन पराभवाची मालिका खंडित करून भारतीय संघाने बुधवारी शानदार विजयाची नाेंद केली. तसेच भारताने बांगलादेशच्या मैदानावर मिळणार्‍या व्हाईटवॉशच्या नामुष्कीला टाळले. यासह टीम इंडियाने यजमान बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेचा शेवट गाेड केला. भारताने मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या सामन्यात ७७ धावांनी विजय मिळवला. भारताने बांगलादेशचा अवघ्या २४० धावांत खुर्दा उडवला. मात्र, सलग दाेन विजयांसह बांगलादेशने भारताविरुद्धची तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावे केली. सुरेश रैना सामनावीर व बांगलादेशचा मुस्ताफिजुर रेहमान मालिकावीरचा मानकरी ठरला.

सुरेश रैना (३/४५), आर. आश्विन (२/३५) आणि धवल कुलकर्णी (२/३४) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने ४७ षटकांत शानदार विजयाची नाेंद केली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमाेर सहा गड्यांच्या माेबदल्यात ३१८ धावांचे खडतर आव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात यजमान बांगलादेशला २४० धावापर्यंत मजल मारता आली.

धावांचा पाठलाग करणार्‍या बांगलादेशकडून शब्बीर रेहमानने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. इतर दिग्गज फलंदाजांना भारताच्या गाेलंदाजीसमाेर फार काळ आव्हान कायम ठेवता आले नाही.

नाणेेफेक जिंकून यजमान बांगलादेश संघाने प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला राेहित शर्मा व शिखर धवनने टीमला ३९ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. मात्र, रेहमानने युवा फलंदाज राेहित शर्माला झेलबाद केले. या वेळी भारताचा सलामीवीर राेहित २९ चेंंडूंमध्ये दाेन चाैकार आणि एका षटकाराच्या आधारे २९ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर विराट काेहलीने संघाचा डाव सावरला. त्याने सलामीच्या शिखर धवनला महत्त्वाची साथ दिली. या दाेघांनी यजमानांची गाेलंदाजी फाेडून काढत दुसर्‍या गड्यासाठी ७५ धावांची भागीदारी केली.

धाेनीचे शानदार अर्धशतक
धाेनीने कंबर कसून टीमच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. त्याने रायडूसाेबत चाैथ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. धाेनीने ७७ चेंडूंत ६९ धावांची खेळी केली. अंबाती रायडूने ४४ धावांचे याेगदान दिले. त्यानंतर रैनाने ३८, स्टुअर्ट बिन्नीने नाबाद १७ व पटेलने नाबाद १० धावा काढल्या.

सामनावीर रैना चमकला
भारतीय संघाकडून गाेलंदाजीमध्ये सुरेश रैना चमकला. त्याने शानदार तीन विकेट घेऊन सामनावीरचा बहुमान पटकावला. याशिवाय आर. आश्विन आणि धवल कुलकर्णी यांनीही संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. या दाेघांनी प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या.

शिखर धवनचे शानदार अर्धशतक
भारतीय संघाकडून सलामीच्या शिखर धवनने तुफानी फटकेबाजी करताना शानदार अर्धशतकाची नाेंद केली. त्याने ७३ चेंडूंमध्ये टीमकडून सर्वाधिक ७५ धावा केल्या. यामध्ये दहा चाैकारांचा समावेश आहे. याशिवाय त्याने काेहलीसाेबत अर्धशतकी तसेच धाेनीसाेबत तिसर्‍या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. मुर्तुझाने धवनला झेलबाद केले.