आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Tour Of Sri Lanka, 1st Test 2nd Day: Sri Lanka V India At Gale

IND vs SL: श्रीलंकेची हालत खराब, 5 धावांवर दोन फलंदाज बाद, भारताकडे 187 धावंची आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
100 धावांची पार्टनरशिप केल्यानंतर शिखर आणि विराट - Divya Marathi
100 धावांची पार्टनरशिप केल्यानंतर शिखर आणि विराट
गाले- तीन सामन्यांच्या मा‍लिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेने भारता विरूद्ध खेळताना दूसर्‍या डावात दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात 5 धावा केल्या होत्या. कुमार संगकारा आणि धमिका प्रसाद हे नॉट आऊट आहेत. दुसर्‍या डावातही श्रीलंकेची सुरूवात निराशाजनकच झाली. त्यांचे दोनही सलामीचे फलंदाज शून्यावर बाद झाले. डावाच्या पहिल्याच षटकात सलामीला आलेल्या करुणरत्नेला अश्विनने शून्यावर बाद केले. त्यानंतर सिल्वाला अमित मिश्राने बोल्ड आऊट केले. सिल्वाही शून्यावर बाद झाला.
ततपश्चात श्रीलंकेने केलेल्या 183 धावांना प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने दुसर्‍या दिवशी आपल्या पहिल्या डावात 117.4 षटकांत सर्वबाद 375 धावा केल्या होत्या. आता भारताकडे 187 धावांची आघाडी आहे. भारतासाठी शिखरने 134 आणि कोहलीने 103 धावा ठोकत शानदार शतक केले . तर रिद्धिमान साहाने 60 धावा केल्या. श्रीलंकेसाठी थिरांडू कौशल याने पाच आणि प्रदीपने 3 विकेट्स घेतल्या.
पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त होण्यापूर्वी टीम इंडियाने दोन विकेटच्या नुकसानावर 128 धावा केल्या होत्या. शिखर धवन (53) आणि कर्णधार विराट कोहली (45) नॉट आउट तंबूत परतले होते.
पहिल्या दिवशी आर.अश्विन चमकला. त्याने श्रीलंकेचे 6 फलंदाज बाद केले होते . अश्विनने आपल्या करियरमध्ये बेस्ट बॉलिंग केली.
तिसर्‍या विकेट्ससाठी 227 धावांची पार्टनरशिप
28 धावांवर दोन टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाल्यावर मैदानावर आलेल्या विराटने दमदार फलंदाजी केली. त्याने ओपनर शिखर धवनच्या साथीने तिसर्‍या विकेटसाठी 64.3 ओव्हर्समध्ये 227 धावांची पार्टनरशिप केली. या दरम्यान शिखरने करिअरचे चौथे शतक 178 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. तर, कोहलीने करिअरची 11वी सेंच्यूरी पूर्ण केली. कौशलच्या एका बॉलवर LBW आउट झालेल्या विराटने अापल्या डावात 191 बॉल्सचा सामना केला आणि 11 चौकार लगावले. शिखर धवनला प्रदीपने बोल्ड केले. धवन 271 चेंडूंमध्ये 13 चौकारांच्या मदतीने 134 धावा केल्या. अजिंक्य रहाणे खाते न खोलताच कौशलच्या बॉलवर LBW आउट झाला.
अजिंक्य रहाणे (0) त्याला कौशलने पायचित केले. ही जोडी अजूनही मैदानावर खेळत आहे. शिखरने त्याचे चौथे शतक 178 चेंडूत 10 चोकारांच्या मदतीने पूर्ण केले.
टीम इंडियाचे विकेट्स
लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला झटका बसला. लोकेशला 7धावांवर प्रसादने पायचित केले. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करण्‍यासाठी मैदानात उतरलेला रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. रोहितने फक्त 9 धावा केल्या. मॅथ्यूजने त्याला बाद केले.

अश्विनच्या फिरकीत अडकले श्रीलंकन, 183 वर गुंडाळला संघ
पहिल्या दिवशी आर. अश्विनच्या ( 6 विकेट घेऊन दिल्या 46 धावा ) फिरकीत श्रीलंका संघ अडकला. श्रीलंकेचे एकापाठोपाठ विकेट गेल्याने संघाला फक्त 183 धावांपर्यंत मजल मारता आली.

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु संघाची खराब सुरुवात झाली. 60 धावसंख्येवर श्रीलंकेचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. श्रीलंकेचा कर्णधार एंजिलो मॅथ्यूज (64) आणि चांडीमल (59) शानदार खेळू शकले.

अश्विनशिवाय अमित मिश्राने 2 विकेट घेतले. तर इशांत शर्मा आणि वरुण आरोनने प्रत्येकी एक-एक विकेट घेतले.
प्लेइंग इलेवन
भारत: विराट कोहली (कर्णधार ), शिखर धवन, रोहित शर्मा, हरभजन सिंह, अमित मिश्रा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), इशांत शर्मा, वरुण आरोन, रविचंद्रन अश्विन.
श्रीलंका: एंजिलो मॅथ्यूज (कर्णधार), कौशल सिल्वा, दिमुथ करूणारत्ने, कुमार संगकारा, लाहिरू थिरिमने (उपकर्णधार), दिनेश चांडीमल, जेहान मुबारक, रंगना हेराथ, धम्मिका प्रसाद, नुवान प्रदीप, पी.एच.टी कौशल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, IND vs SL सामन्याचे फोटो...