आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेराथ याने टीम इंडियाच्या फलंदाजांना पाणी पाजले. लोकेश राहुलच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. 5 धावा बनवून तो LBW आऊट झाला. त्यानंतर इशांतही हेराथच्या षटकात LBW आऊट झाला. रोहित शर्मा 4 धावा काढून हेराथच्या चेंडूने बोल्ड झाला. विराट कोहलीही फार काळ टिकला नाही. केवळ 3 धावा काढून तो तंबूत परतला. साहा आणि हरभजनची कामगिरीही ढिम्म राहिली. हेरथने तब्बल 7 भारतीय खेळाडूंना परतून लावले. उरलेल्या तीन विकेट कौशलने घेतल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.